आकोट – संजय आठवले
आकोट न्यायालयाचे न्याय दंडाधिकारी प्रथम श्रेणी तथा दुसरे सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर विनायक रेडकर यांनी धनादेश अनादरण प्रकरणी आरोपीची निर्दोष मुक्तता केली आहे.
एका व्यवहाराचे कारणातून फिर्यादी मोहन अवधुत गावंडे यांनी आरोपी रितेश सुकलाल बन्नावडे रा.आकोट यांचे विरूध्द रू. १,००,०००/- इतक्या रकमेचे धनादेश अनादरण प्रकरण फौजदारी खटला कं. ६८६/२०१७ व्दारे आकोट न्यायालयात दाखल केले.
सदरहू प्रकरणात आरोपीचे विधीज्ञ दिपक. डि. वर्मा यांनी बचाव पक्षाची बाजू मांडली. त्यावर फिर्यादी पक्षाने आपला युक्तिवाद केला. दोन्ही बाजूंच्या विस्तीर्ण युक्तीवादानंतर आरोपीवर अपराध सिद्ध झाला नाही. त्यामुळे न्यायाधिश विनायक रेडकर यांनी आरोपी रितेश सुकलाल बन्नावडे यांची निर्दोष मुक्तता केली.
सोबतच फिर्यादी यांचे वरील रकमेचे मागणी प्रकरण खारीज केले आहे. सदरहू प्रकरणात आरोपी तर्फे आकोट येथील विधीज्ञ दिपक डि. वर्मा यांनी कामकाज पाहीले.