Thursday, October 17, 2024
Homeराज्यविधानसभा निवडणुकीसाठी प्रशाषण सज्ज - ७५ % मतदार अपेक्षीत...

विधानसभा निवडणुकीसाठी प्रशाषण सज्ज – ७५ % मतदार अपेक्षीत…

मतदानाचा हक्क बजावा – निवडणूक अधिकाऱ्यांचे आवाहन

रामटेक – राजू कापसे

निवडणूक आयोगाने मंगळवारी (ता.१५) महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा केली. जिल्ह्यात आचारसंहिता लागू झाली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली असुन नागरिकांनी मतदानाचा हक्क अवश्य बजवावा असे आवाहन निवडणुक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी ( महसुल ) प्रियेश महाजन यांनी काल दि. १६ ऑक्टोंबर ला पार पडलेल्या पत्रपरिषदेत केले.

प्रियेश महाजन यांनी दिलेल्या माहितीनुसार रामटेक विधानसभा मतदारसंघात ३५९ मतदान केंद्रे आहेत. २ लाख ८५ हजार ७१४ मतदार २० नोव्हेंबर रोजी मतदानाचा हक्क बजावतील. लोकशाहीच्या या उत्सवात मतदारांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी प्रियेश महाजन यांनी केले.

विधानसभा निवडणूक पारदर्शक व भयमुक्त वातावरणात पार पाडण्याकरिता प्रशासन प्रयत्नशील असून नागरिकांनी यासाठी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले. तहसील कार्यालयाच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. तहसीलदार रमेश कोळपे व नायब तहसीलदार (निवडणूक) महेश कुलदिवार हे यावेळी उपस्थित होते.

५९-रामटेक विधानसभा मतदारसंघात १ लाख ४२ हजार ९०२ पुरुष मतदार १ लाख ४२ हजार ४४० महिला मतदार व २ तृतियपंथी असे आणि सैनिक मतदार ३७० एकूण २ लाख ८५ हजार ७१४ मतदार आहेत. इलेक्ट्रानिक्स मतदान यंत्रांची प्रथमस्तरीय तपासणी झाली असून बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट व व्हीव्हीपॅट उपलब्ध आहेत. ही सर्व मतदान यंत्रे सुरक्षा व्यवस्थेत ठेवण्यात आल्याचे उपविभागिय अधिकारी यांनी सांगितले.

भरारी पथके लागली कामाला

आदर्श आचारसंहितेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी फ्लाईंग स्कॉड (भरारी पथक), एफएसटी, व्हिडीओ टीम, दारू, रोकड, प्रतिबंधित औषधे यांची सखोल तपासणी. राज्य उत्पादन शुल्क विभागांतर्गत अवैध नशीले पदार्थाच्या वाहतुकीसंदर्भात भरारी पथक तत्काळ कार्यान्वित करण्यात आले आहेत.

रामटेक विधानसभा क्षेत्रात तीन नाके मानेगाव टेक, अंबाझरी, घोटीटोक येथे तयार करण्यात आले आहेत. या नाक्यांवर स्थिर निगराणी पथक नेमण्यात आले असून रामटेक तालुक्यात १५८, पारशिवनी तालुक्यात १५५ तर मौदात ४६ मतदान केंद्र राहणार आहेत. मतदान केंद्रावर १५८० कर्मचारी कर्तव्य बजावणार आहे.

सहाय्यक निवडणूक अधिकारी रामटेक तहसीलदार रमेश कोळपे, पारशिवनी तहसीलदार सुरेश वाकचौरे, बिडीओ जयसिंग जाधव कार्य बघणार असल्याची माहिती उपविभागिय अधिकारी प्रियेश महाजन यांनी दिली.

Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
मी, राजू कापसे रा, रामटेक जि, नागपूर येथील रहिवासी असून मी पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 30 वर्षा पासून आहे. महाव्हाईस न्यूज च्या मुख्यकार्यकारणी व्यवस्थापन संघाचा सदस्य आहे, जेव्हापासून महाव्हाईस न्यूज ची सुरुवात झाली तेव्हापासून रामटेक तालुक्यातील काम सांभाळत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: