Wednesday, October 16, 2024
Homeगुन्हेगारीअमरावती | हुंड्यासाठी लग्नाच्या दीड वर्षांनी विवाहितेला जिवंत जाळले?...धामणगाव रेल्वे येथील दत्तापूर...

अमरावती | हुंड्यासाठी लग्नाच्या दीड वर्षांनी विवाहितेला जिवंत जाळले?…धामणगाव रेल्वे येथील दत्तापूर येथील घटना…

धामणगाव रेल्वे : दीड वर्षापूर्वी लग्न लग्न झालेल्या तरुणीला तिच्या सासरच्या लोकांनी हुंड्याच्या मागणीवरून जिवंत जाळले. असा गंभीर आरोप मुलीच्या आईने केला असून ही घटना ०९ ऑक्टोबर २०२४ रोजी धामणगाव रेल्वे येथे घडली असून ऋतुजा विपिन कट्ट्यारमल असे मृत तरुणीचे नाव असून तिचा दीड वर्षापूर्वी धामणगाव येथील विपिन कट्ट्यारमल यांच्याशी विवाह झाला होता. ऋतुजा जळाल्याची बातमी मिळताच कुटुंबाने यवतमाळ येथील रुग्णालय धाव घेतली मात्र तो पर्यंत ती मृत झाली होती.

मृत तरुणीच्या आईने दत्तापूर पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून…माझी दुसरी मुलगी ऋतुजा घोडेराव हिचे लग्न दि. 13/06/2023 रोजी रितीरिवाजाप्रमाणे धामणगाव रेल्वे येथील विपीन वासुदेव कटयारमल यांचे सोबत झाले होते. माझे जावई पुणे येथे इंजीनियर म्हणुन कंपनीमध्ये काम करत होते. लग्न झाल्यानंतर लगेच काही दिवसांनी माझे जावई माझे मुलीला घेवुन पुणे येथील लोणी काळभोर ता. हवेली या ठिकाणी त्यांचे स्वतःचे घरी घेवुन गेले. त्यांचे सोबत माझे मुलीची सासु ज्योती वासुदेव कटयारमल, सासरे वासुदेव गोपाळ कटयारमल तसेच दिर कुणाल वासुदेव कटयारमल असे राहत होते. त्यानंतर जवळपासर तिन महिने माझी मुलगी ऋतुजा हीचे सोबत तिचे पती व घरचे लोक हे माझे मुलीसोबत चांगले राहीले. त्यानंतर या सर्व लोकांनी माझे मुलीला त्रास देणे सुरू केले. तेव्हा माझी मुलगी ऋतुजा हीं फोन करून माझे सोबत बोलायची व मला सांगत होती की, माझे पती, सासु, सासरे व दिर हे, मला किरकोळ कारणावरून त्रास देतात व मला शारीरीक व मानसिक त्रास देतात तसेच त्यांना धामणगाव रेल्वे येथील माझे मुलीचे मोठे सासरे हरिभाऊ गोपाळ कटयारमल हे माझे पती व माझे सासु सासरे यांना चुकीची माहिती देवुन माझे विरूध्द भडकवीतात त्यामुळे हे सर्व मला शारीरीक व मानसिक त्रास देतात. घरामध्ये जेवण तयार केले असता हेच का केले, एढेच का केले असे म्हणुन शारीरीक व मानसिक त्रास देत होते व मला सुध्दा जेवण ठेवत नव्हते व मला मारहाण सुध्दा करतात अशी माझी मुलगी मला फोन करून सांगत होती. तेव्हा मी माझे मुलीची समजुत काढत होती. परंतु काही दिवसांनी माझे मुलीचे पती व सासु सासरे हे मला फोन करून बोलले की आम्हाला गाडी घेण्याकरीता चार ताख रुपये पाहीजे तेव्हा मी त्यांना दोन लाख रूपये दिले होते. त्यानंतर त्यांचे नेहमी मला पैसे मागणे सुरू झाले परंतु माझे कडे पैसे नसल्याने मी त्यांना पैस देणे बंद केले. मी ज्यावेळी त्यांना पैसे देणे बंद केल्याने माझे मुलीचे पती व सासु सासरे व दिर हे हरिभाऊ कटयारमल याचे सांगण्यावरून त्यांनी माझे मुलीसोबत फारकत घेण्याकरीता कोर्टामध्ये याचीका दाखल केली. तेव्हा आम्ही कोर्टास कळविले की, आमची मुलगी त्यांचे सोबत नांदायला तयार आहे. परंतु माझे मुलीचे सासु सासरे, दिर व पती हे तसेच तिचे मोठे सासरे हरीभाउ कटयारमल हे वारंवार माझे मुलीला त्यांचे गाडीचे पैसे व इतर कामाकरीता पैसे आणायला सांगत होते व न दिल्यास तिला मारहाण तसेच तिचा मानसिक व शारीरीक छळ करत असल्याने माझे मुलीने जिल्हा पुणे येथील लोणी काळभोर येथे जानेवारी 2024 मध्ये तक्रार सुध्दा दिली होती व त्या ठिका गो अप.नं. 32/24 कलम 498, 504, 506, 323 भादवि प्रमाणे गुन्हा दाखल आहे. त्यानंतर मी माझे मुलीला माझे घरी दर्यापुर येथे घेवुन आली होती.

दि. 08/10/2024 रोजी माझी मुलगी ऋतुजा हिने मला सांगीतले की, माझे पती मला धामणगाव रेल्वे येथे बोलावित आहेत. तेव्हा माझी मुलगी ही दुपारी 04.00 वा. दरम्यान धामणगाव रेल्वे येथे तिचे पतीचे घरी निघुन गेली. तेव्हा दि. 09/10/2024 रोजी सकाळी 07.00 वा. दरम्यान माझ पुतण्या याचा सुनिल विजय घोडेराव रा अकोला यांचा माझी मुलगी प्रियंका घोडेराव हिला फोन आला व त्याने सांगीतले की, ऋतुजा ही जळाली असुन तिला यवतमाळ येथे रेफर केले आहे. त्यानंतर आम्ही माझे दिर बिरजु प्रल्हादराव घोडेराव रा. यवतमाळ यांना फोन करून पाहण्यास सांगीतले असता त्यांनी दवाखान्यामध्ये पाहणी करून सांगीतले की ऋतुजा ही पुर्णपणे जळाली असुन मरण पावली आहे. तरी मी माझी मुलगी ऋतुजा विपीन कटयारमल हीला तिचे पती विपीन वासुदेब कटयारमल वय 32, तिचे सासरे वासुदेव गोपाळ कट्यारमल वय 65 वर्ष, तिची सासु ज्योती वासुदेव कट्यारमल वय 60 वर्ष, तिचे दिर कुणाल वासुदेव कट्‌यारमल वय 28 वर्ष व माझे मुलीचे मोठे सासरे हरिभाऊ गोपाळ कटयारमल वय 70 वर्ष सर्व रा. विठठल मंदिराजवळ, दत्तापुर यांनी माझे मुलीला लग्न झाल्यानंतर गाडी घेण्याकरीता व इतर कामाकरीता वारंवार पैसे व हुंड्याची मागणी केली असुन तिला नेहमी शारीरीक व मानसिक त्रास देवुन तिचा छळ केला व त्यामुळे माझी मुलगी जळुन मरण पावली असुन माझे मुलीचे मरणास हेच लोक कारणीभुत असल्याने मी त्यांचे विरूध्द तक्रार देत आहे…

Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: