Wednesday, October 16, 2024
Homeराजकीयमूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघात स्वयंघोषित भावी उमेदवारांचा पैठणीचा खेळ दाखवून...

मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघात स्वयंघोषित भावी उमेदवारांचा पैठणीचा खेळ दाखवून…

मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघात सध्या स्वयंघोषित भावी उमेदवारांनी धुमाकूळ घातला आहे. तर यासाठी बरेच भावी सक्रीय झाले असून या कार्यक्रमाच्या माध्यमातून शहरातील महिलांना पैठणीचे आमिष दाखवून निवडणुकीसाठी स्वताचे लॉन्चिंग कार्यक्रम सुरु केले आहेत. घरगुती महिलांना अश्या कार्यक्रमात बोलावून एखादा मराठी चित्रपटाचा नट आणून त्याठिकाणी आपला मुळ उद्देश काय आहे हे दाखवीत आहेत. एवढच काय तर आपल्यालाच पक्षाचे तिकीट मिळणार असल्याचे भासवत आहे. तर अश्या प्रसिद्धी पिसाट भावी उमेदवारांचा समाजकारणाशी कवडीचा संबंध नसल्याचे दिसून येते. हे केवळ राजकारणाच्या हौशीपायी नाटक करीत असल्याचे जनतेला दिसत आहे. त्यासाठीच ते मतदारसंघात घीरट्या घालत आहे. तर या अशा हौशी लोकांना गेल्या पाच वर्षात जनतेतील एकानेही आजपर्यंत बघितले नसून फक्त निवडणुकीसाठीच ते मतदारसंघात सक्रिय झाले आहेत.

मागील वीस ते पंचवीस वर्षापासून शहरातील पाणी प्रश्न सुटला नसून तो सोडविण्यासाठी एकाही पक्षाच्यावतीने आंदोलन किंवा निवेदन दिले नाही. तर निवडणूक तोंडावर असताना फक्त या शहराची आठवण येते. शहरात दाखल होताच दोनचार उपाशी लोकांना हाताशी धरून ते अश्या कार्यक्रमाचे नियोजन करतात आणि गर्दी जमविण्यासाठी एखाद्या मराठी कलाकाची निवड करून आणि मनात आले तेव्हा हा कार्यक्रम घेतात. अश्या कार्यक्रमाना भोळ्या भाबड्या महिला बळी पडतात. साडी भेटणार या आशेने ते कार्यक्रमात येतात. मात्र हा कार्यक्रम अगोदरच फिक्स असते त्यामुळे हे लोक ओळखीच्या महिलांना साडी देवून बाकी गरीब महिलांचा हिरेमोड करतात. तर निवडणुकीच्या तोंडावर असले कार्यक्रम घेवून सामान्य महिलांना वेठीस धरण्याचे काम या मतदार संघातील स्वयंघोषित उमेदवार करीत आहेत. अश्या उमेदवारांची निवडून येण्याची लायकी नसून फक्त शोबाजी साठी वारेमाप खर्च करीत असल्याचे निदर्शनास येत आहे.

तर काही स्वयंघोषित भावी आमदार सोशल मीडियावर लोकांना विनाकारण छळत असल्याचे समजते कोणाच्याही कार्यक्रमात किंवा आंदोलनात सहभागी होऊन आपण त्यांचा मसीहा असल्याचे भासवून गोरगरिबांच्या भावनाशी खेळत असल्याचेही समजते. अशा संधी साधू लोकांना मतदारसंघातील जनता चांगलीच ओळखून आहे. तर या मतदारसंघाचा इतिहास जर पाहिला तर या मतदारसंघात आतापर्यंत जे आमदार निवडून आलेत त्यांनी कधी अशा कार्यक्रमाचे आयोजन केले नाही , त्यांना लोकांना काय पाहिजे हे चांगलं ठाऊक आहे. निवडणुकीच्या तोंडावर ते जाती-धर्माचा डोस पाजून बरोबर मतदार आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न करतात आणि याला मतदार बळी पडतात. मात्र या वेळेस या मतदारसंघात असे होणार नाही, यावेळी मतदारसंघात वेगळच चित्र निर्माण झाले आहे. मतदारांना त्यांच्यासारखाच व त्यांच्या समस्येची जाण असणारा प्रतिनिधी हवा आहे. शो बाजी करणारा किंवा व्हीआयपी प्रतिनिधी जनतेला नकोय…

Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: