योगेश चांदणे, राजकीय ब्युरो
राज्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल केव्हाही वाजू शकते. असे संकेत निवडणूक आयोगाकडून मिळत आहेत. त्यापूर्वीच अनुसुचीत जातीसाठी राखीव असलेल्या दर्यापूर मतदार संघावर जिल्ह्यातील काही पार्सल उमेदवारांची नजर असून ते सर्व मतदार संघात घिरट्या घालत असल्याचे दिसत आहे. गेल्या पाच वर्षात कधीहि न बघितलेले चेहरे सध्या मतदार संघात दिसत असल्याने जनसामान्यात चर्चेचा विषय झाला आहे. खासदार बळवंत वानखडे यांचा गढ असलेल्या दर्यापूर मतदार संघात महायुतीला जिंकण्यासाठी मोठे प्रयत्न करावे लागणार आहेत. म्हणूनच अनेक हौशी उमेदवारांचा जोर या मतदारसंघात वाढला आहे. तर महाविकास आघाडीकडून जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरच्या उमेदवारांनी मोठी गर्दी केल्याचे दिसत आहे. यासाठी त्यांनी शहरातील मुख्य चौकात पोस्टरबाजी करून स्थानिक व गरीब उमेदवारांना डिवचत असल्याचे दिसत आहे.
यासाठी काही पैशेवाल्या उमेदवारांनी गुडघ्याला बाशिंग बांधून दर्यापूर मतदार संघामध्ये बस्थान मांडले आहे. सांस्कृतिक व सामाजिक व शैक्षणिक कार्यक्रम घेऊन आपणच उमेदवार म्हणून प्रचार करायला सुरुवात केली आहे. या सर्व पार्सल उमेदवारामुळे दर्यापूर मतदार संघातील जनता त्रस्त झाली आहे. स्वयंघोषित नेत्याच्या नागरिकाच्या भेटीगाठी व फोटो काढून सोशल मीडिया वर टाकून प्रचार कार्यक्रम सुरू आहे. तर मतदार संघाची आम्हालाच पक्षाची तिकीट मिळणार असल्याचे सांगत आहे. असा आपल्या नावाचा प्रचार सुद्धा करत आहेत. मतदार संघातील जनता यांचे असे नाटक मुकाट्याने पाहत आहेत. यांना मतदार संघात कोणत्या समस्या आहेत हे सुद्धा माहित नाहीत मात्र असे भासवतात की या मतदार संघाची कुंडलीच यांच्याकडे आहे. आता आचार संहिता लागल्या नंतर पक्ष कोणाला उमेदवाराला उमेदवारी देणार?. महायुती व महाविकास आघाडी स्थानिक उमेदवाराला संधी देणार आहे की बाहेरच्या पार्सल उमेदवारांना?. दर्यापूर येथील स्थानिक लोकांना स्थानिक उमेदवारच पाहिजे असल्याचा सूर सध्या निघत आहे. मात्र कॉंग्रेस यावेळी निष्ठावंत कार्यकर्त्यालाच उमेदवारी देणार असल्याचे समजते.
मागील विधान सभेला स्थानिक उमेदवार बळवंत वानखडे काँग्रेसपक्षाकडून निवडून आले होते. त्यांना 95889 मते मिळाली होती.महायुती च्या उमेदवार यांच्या पेक्षा 30000 पेक्षा जास्त लीड घेतली होती.स्थानिक उमेदवार म्हणून सर्व दर्यापूर मतदार संघातील लोकांनी त्यांना निवडून देऊन पाठिंबा दिला होता. यावेळेस महाविकास आघाडी ही जागा परत आपल्या जवळ ठेवणार का? किंवा महायुती 2019 चा वचपा यावेळी काढणार का?. तर नुकत्याच आटोपलेल्या लोकसभा निवडणुकीत विदर्भात कॉंग्रेस ने दणदणीत विजय संपाद्दन केल्यानंतर अवघ्या विदर्भात कॉंग्रेसची ताकद वाढली असल्याचे राजकीय तज्ञ सांगतात.