Wednesday, October 16, 2024
Homeगुन्हेगारीबल्लारपूर पोलीसांनी केला मोटरसायकल चोर टोळींचा पर्दापाश..! चार आरोपी अटक…

बल्लारपूर पोलीसांनी केला मोटरसायकल चोर टोळींचा पर्दापाश..! चार आरोपी अटक…

बल्लारपूर/चंद्रपूर – नरेंद्र सोनारकर

गेली अनेक महिन्यापासून सतत परिसरातील नागरिकांच्या मोटर सायकल चोरी जात होत्या. दिनांक-२२ सप्टेंबर २०२४ रोजी पोलीस ठाणे बल्लारपूर येथे फिर्यादी अजय रामसागर बेन्नी वय-३७ वर्षे रा. कादरीया मस्जिद चौक बल्लारपुर जि. चंद्रपुर याने पोलीस ठाणे बल्लारपुर येथे येवुन मोटार सायकल चोरीची तक्रार दिल्यावरुन पोलीस ठाणे बल्लारपुर गुन्हा रजि. क्रं. ९०९/२०२४ कलम-३०३ (२) भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.अशी माहिती ठाणेदार गाडे यांनी पत्रपरिषदेत दिली.

मोटार सायकल चोरी व आरोपीचा घेण्यासाठी दिनांक- ०४ ऑकटोंबर रोजी पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलींग करीत असतांना बल्लारपूर पोलिसांनी संशयीतरित्या फिरत असतांना एकाला ताब्यात घेवुन नाव पत्ता विचारला असता त्याने त्याचे नाव प्रिन्स ऊर्फ कालु संग्राम बहुरीया वय-२० वर्षे रा. सरदार पटेल वार्ड, बल्लारपुर जि. चंद्रपुर असे सांगितले वरुन त्यास मोटार सायकल चोरी बाबत विचारपुस केली असता.

त्याने मोटार सायकल चोरी केल्याची कबुली देवुन ०२ मोटार सायकल काढुण दिल्या त्यास अधिक विचारपुस केली असता. त्याने सांगितले की, मी माझा मित्र- सुरेश ऊर्फ सुर्या कैलाश हरणे वय-२० वर्षे रा. श्रिराम वार्ड बल्लारपुर जि. चंद्रपुर यांचेसह मिळुन मौजा बामणी व आंबेडकर वार्ड बल्लारपुर परिसरातुन मोटार सायकल चोरी केली आहे.

त्या मोटार सायकल मी माझा मित्र नामे- पुतीलाल ऊर्फ हनी बाबुलाल निशाद वय-३० वर्षे रा. रामनगर सास्ती झेंडा वस्ती ता. राजुरा जि. चंद्रपुर याला विक्री केल्याचे सांगितले व त्याचेकडे घेवुन गेला असता त्यास आरोपी क्रं.१) ने मोटार सायकल दिल्याबाबत विचारपुस केली असता. त्याने मोटार सायकल घेतल्याचे सांगितले व घरासमोर उभ्या असलेल्या ०३ मोटार सायकल काढून दिल्या. त्यानंतर आरोपी क्रं.१ ला अधिक विचारपुस केली असता.

त्याने आणखी मोटार सायकल मी व माझा मित्र सुर्या हरणे, लवकुश ऊर्फ गुडु निशाद असे मिळुन पोलीस ठाणे राजुरा व पोलीस ठाणे चंद्रपुर शहर तसेच पोलीस ठाणे बल्लारपुर येथुन चोरी केलेल्या मोटार सायकल भगतसिंग वार्ड येथिल आरोपी नामे ४) तौकीर तौहिद शेख वय-२७ वर्षे व्यवसाय मोटार सायकल गॅरेज रा. भगतसिंग वार्ड बल्लारपुर जि. चंद्रपुर यास दिल्याचे सांगुन त्याचेकडे घेवुन गेला.

त्यावेळी त्याचेकडे मोटार सायकल बाबत विचारपुस केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिले तेव्हा त्याचे मोटार सायकल गॅरेजची पाहणी केली असता पुर्ण मोटार सायकलचे स्पेअर स्पॉर्ट खोलुन दिसले. त्यातील ०३ मोटार सायकल इंजिन ची पाहणी करुन त्याबाबत विचारपुस केली असता त्याने चोरीचे असल्याचे सांगितले.

त्यानंतर त्यास आणखी विचारपुस केली असता त्यांने काही इंजिन भंगार दुकानदार नामे जावेद यास विक्री केल्याचे सांगितल्याने त्यास भंगार दुकान येथे आणुन भंगार दुकानाची पाहणी केली असता भंगार दुकानात ०४ मोटार सायकल इंजिन संशयीतरित्या मिळुन आल्या. याबाबत भंगार दुकानदार जावेद यास विचारपुस केली असता त्याने उडवाउडवीचे असमाधानकारक उत्तर दिल्याने सदर मोटार सायकल ताब्यात घेवुन त्याची शहानिशा करुन पुढील कार्यवाही करण्याची तजविज ठेवली आहे.

आरोपी नामे प्रिंन्स ऊर्फ कालु संग्राम बहुरीया रा. सरदार पटेल वार्ड बल्लारपुर याचे ताब्यातुन जप्त केलेली एक काळया रंगाची हिरो कंपनीची फॅशन प्लॅस मोटार सायकल क्र.एम.एच.३४ झेड ११४० ही मोटर सायकल.एक काळ्या रंगाची बजाज प्लसर मोटार सायकल क्र.एम.एच.३४ ए.एस.५२३७. आरोपी नामे पुतीलाल ऊर्फ हनी बाबुलाल निशाद रा. रामनगर सारती ता.राजुरा याचे ताब्यातून जप्त एक काळया रंगाची हिरो स्लेंडर कंपनी मोटार सायकल क्र.एम.एच.३४ बी.जे.५९३७,एक काळया रंगाची हिरो कंपनीची स्प्लेंडर मोटार सायकल क्रं.एम.एच.३४ झेड.३१२८,एक कालया रंगाची हिरो होन्डा कंपनीची स्प्लॅन्डर प्लॅस मोटार सक्यकल क्रं.एम.एच.३४ ऐ.जे.५७५१,आरोपी नामे तौकीर तौहीद शेख.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: