Friday, November 22, 2024
Homeराजकीयजिल्हयातील आरक्षित दोन्ही विधानसभा मतदारसंघात दोघा पितापुत्रांनाच आमदारकीची संधी...नेत्यांची चमकोगिरी करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या...

जिल्हयातील आरक्षित दोन्ही विधानसभा मतदारसंघात दोघा पितापुत्रांनाच आमदारकीची संधी…नेत्यांची चमकोगिरी करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हाती धुपाटनेच…देगलूर विधानसभेसाठी पुन्हा तीच परिस्थिती?


बिलोली, रत्नाकर जाधव
अनुसूचित जातीसाठी राखीव राहिलेल्या दोन्ही विधानसभा मतदारसंघात तिन पितापुत्रांनाच संधी मिळाली असून आयुष्यभर नेत्यांच्या मागे फिरणाऱ्या स्थानिक कार्यकर्त्यांच्या हाती मात्र आत्ता प्रयन्त धुपाटनेच आले आहे.आगामी विधानसभा निवडणुकीतही अशीच निराशा स्थानिकांची होणार का? असा प्रश्न उपस्थित होतांना यावेळेस जर आजी माजी आमदारानांच प्रमुख पक्षांकडून संधी मिळल्यास त्या दोघांना ही तीन वेळा संधी मिळाली तर मात्र स्थानिक कार्यकर्त्याना आत्ता त्यांच्या छतरंज्या उचलण्याचे व जोहार करण्याचेच काम करावे लागणार आहे.

नांदेड जिल्ह्यात अनुसूचित जातीसाठी आधी मुखेड व त्यानंतर अलीकडच्या काळात देगलूर विधानसभा मतदारसंघ अनुसुचित जातीसाठी राखीव राहिला आहे.यात मुखेड विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व पिराजी साबणे यांनी दोन वेळा तर त्यांचे पुत्र सुभाष साबणे यांनी दोनवेळा केले तर देगलूर विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी आरक्षित झाल्यापासून विधानसभेच नेतृत्व स्वर्गीय रावसाहेब अंतापुरकर यांनी दोनवेळा व त्यांचे सुपुत्र जितेश अंतापुरकर यांनी पोटनिवडणुकीत साबणे यांचा पराभव करत नेतृत्व केले. आगामी विधानसभेत जर भाजपाकडून संधी मिळाली तर ते ही साबणे पितापुत्रांच्या बरोबरीने येतील. देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघातील मातब्बर नेते समजले जाणारे माजी खा.भास्करराव खतगावकर यांचा शब्द हा अंतिम असल्यामुळे त्यांच्याकडे अगदी ग्राऊंड लेवल पासून कार्यकर्ता म्हणून राहिलेल्या कार्यकर्त्याला आमदारकीची संधी देण्यापेक्षा या मातब्बर नेत्यांनी कधीच ग्राऊंड लेवलला काम न केलेल्या परंतु पैशाने मातब्बर असलेले उपऱ्यांना कार्यकर्त्यांच्या माथी मारून आमदारकी बहाल केली व कार्यकर्त्याना मात्र जोहार पुरते व छतरंज्या उचलण्यापूरतेच मर्यादित ठेवले.

याच मूर्तिमंत उदाहरण म्हणजे देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघात माजी जि.प.अध्यक्ष स्वर्गीय संभाजी मंडगीकर,स्वर्गीय एल.एस.रानवळकर गुरुजी,सुभाष गायकवाड, धोंडिबा कांबळे,निवृत्ती कांबळे,शत्रुघ्न वाघमारे, भीमराव जेठे,विवेक केरूरकर ही बौद्धिक पातळी असलेल्या व जनसामान्य माणसांचा आधार असलेल्या कार्यकर्त्याना केवळ मर्यादित ठेवत मुबंई,मुखेड वरून उचलून आणलेल्या बुजगावण्यांना संधी देत स्थानिक कार्यकर्त्यांची घोर निराशा केली. कार्यकर्त्यांनी नेते काँग्रेस मध्ये असो की भाजपात जावो केवळ त्यांच्या मागे जाऊन जयजयकार करावं एवढंच मर्यादित ठेवलं.परंतु २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपासून थोडा बदल झाला आहे आणि त्याच उत्तर या प्रस्थापित व स्वतःच्या नावे सातबारा असल्याचा दावा करणाऱ्या नेत्यांना आला आहे.त्यामुळे या मतदारसंघातील प्रस्थापित समजल्या जाणाऱ्या नेत्यांना त्यांच्या पश्चात राजकारणात त्यांच्या वारसदारांना राजकीय अस्तित्व टिकवायच असेल तर आगामी विधानसभा निवडणुकीत त्या प्रस्थापित नेत्यांनी आजतागायत नेत्यांचा शब्द अंतिम समजणाऱ्या कार्यकर्त्याना संधी द्यावी लागणार आहे.जो पर्यन्त हा मतदारसंघ आरक्षित आहे तो पर्यन्तच नेत्यांचा मान ठवतील परंतु जेंव्हा मतदारसंघाचं आरक्षण उठलं की मात्र उपरे मदतीला येणार नाहीत तर सतरंज्या उचलण्यापूरते व जोहार करण्यापूरते कार्यकर्तेच दुमतीला येणार आहेत असे समजून स्थानिकच्या प्रस्थापित नेत्यांनी या विधानसभेत संधी देऊन आपला वरदहस्त त्यांच्यावर ठेवणे भविष्यात प्रस्थापित राजकारण्यांना फायद्याचे ठरणार आहे.

परंतु सध्या जिल्ह्यातील मातब्बर समजले जाणारे व देगलूर बिलोली विधानसभेचे किंगमेकर माजी खा.भास्करराव पाटील खतगावकर हे अवघ्या तीन महिन्यातच भाजपा सोडून काँग्रेस मध्ये येत असल्याचे समजते. त्यांच्या या सततच्या पक्षांतर भूमिकेमुळे त्यांचे कार्यकर्ते जरी नंदी सारखे त्यांच्या मागे जात असतील तरी खतगावकरांच्या या सततच्या दल बदलू भूमिकेला स्वीकारतील का ? हा प्रश्न उपस्थित होत आहे.स्वतःच्या राजकीय स्वार्थापोटी नेत्यांकडून बदलत असलेल्या भूमिकेला लोकसभा निवडणुकीत मतदारांकडून अप्रत्यक्ष उत्तर मिळाले आहे.त्यामुळे तीन महिन्यांच्या आधी काँग्रेस मधून भाजपात गेलेले व परत पुन्हा तीन महिन्यातच खातगावकरांचा काँग्रेस मध्ये जर प्रवेश झाला तर त्यांच्या या भूमिकेला मतदार कसा प्रतिसाद देतात हे विधानसभा निवडणुकीत येणाऱ्या निकला नंतर स्पष्ट होईल.जर खातगावकरांची काँग्रेस प्रवेश झाला तर ही भूमिका खतगावकरांची स्वतःची आहे की जिल्ह्यात दाजी भाऊजीचेच राजकारण अबादीत ठेवण्यासाठी अशोकराव चव्हाण व भास्करराव खतगावकर यांची राजकीय खेळी तर नाही नां? किंवा लोकसभा निवडणुकीत भाजपात जाण्याच्या घातकी निर्णयामुळे त्यांच्या स्नुषा सौ.मिनलताई खतगावकरांची खासदारकीची संधी गेल्यामुळे नाराज झालेल्या स्नुषाच्या अट्टहास व राजकीय पुनर्वसनसाठी? असे अनेक प्रश्न चर्चिले जात आहेत.परंतु खतगावकरांच्या या सततच्या बदलत्या भूमिकेमुळे त्यांच्या समर्थकांची मात्र दमछाक होत आहे.त्यामुळे आत्ता खतगावकरांची भूमिकेकडे देगलूर व नायगाव विधानसभा मतदारसंघाचे लक्ष आहे.

Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: