Sunday, October 13, 2024
HomeMarathi News Todayश्री दिलीप हल्याळ यांच्या आठवणीतला एक दिवस...!

श्री दिलीप हल्याळ यांच्या आठवणीतला एक दिवस…!

अत्यंत दुःखद घटना घडली आहे , माझा आठवणीतील एक दिवस सर यांच्या बरोबर घालवण्यासाठी मिळाला होता , ती आठवण मि कधीच विसरू शकत नाही, कारण अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषद च्या नाटय जागर स्पर्धेचा तो दिवस होता, बालगोपाल यांची अंतिम स्पर्धा होती त्यात नाटय वाचन, बालनाटय, बालगीतगायन ,एकपात्री , नाटय संगीत , अश्या झाल्या होत्या, स्पर्धा सुरू होण्यापूर्वी टेबल मांडणी सुरू होती, आणि एकपात्री स्पर्धा सुरू एक स्पर्धकांचे एकपात्री करताना त्याचा मेकअप केला होता, हातापायाला पावडर सांडली होती, कोणी साफसफाई वाले जवळ नव्हते त्यांना बोलवायला आमचा मित्र गेला होता पण स्पर्धा पटापट सुरू करायच्या होत्या, वाट बघणे मला पटले नाही मी माझ्या किश्यातील रुमाल काढला आणि स्टेज वर सांडलेली सपेद पावडर झाडायला लागलो, ती झाडून झाल्यावर मला दिलीप हल्लाळ सर यांनी स्टेजवर उभे राहा सांगून सर्व स्पर्धेक यांना आणि पालकांना सांगितले की नाट्यकर्मी ला कोणतेही काम जमले पाहिजे, तोच खरा नाट्यकर्मी, आणि मी केलेल्या कामासाठी सर्वांना टाळ्या वाजवून माझे अभिनंदन करा असे सांगितले मला खूप तेव्हा गहिवरून आले आणि मी सरांना भेटून नमस्कार केला, त्यावेळी परीक्षक दिलीप हल्याळ सर यांच्या बरोबर। अभिनेते विजय पाटकर सर पण होते त्यांनी ही माझे कौतुक केले, मी दिलीप हल्याळ यांना म्हणालो सर मी एक कार्यकर्ता आहे, आपण मला हा मान दिल्या बद्दल मी आपला ऋणी राहीन असें सांगून पुढील कामास निघून गेलो…! असे होते आमचे लाडके हळवे हृदय असणारे सर्वाना खळखळून हसवणारे , प्रत्येकाला मानसन्मान देणारे प्रसिद्ध अभिनेते , लेखक , परीक्षक श्री दिलीप हल्याळ सर भावपूर्ण श्रद्धांजली , आणि मानाचा मुजरा…💐 – गणेश तळेकर

Ganesh Talekar
Ganesh Talekarhttp://mahavoicenews.com
मी, गणेश दत्तात्रय तळेकर, महाव्हाईस न्यूज च्या उपसंपादकीय पदावर असून मराठी चित्रपट इंडस्ट्री, मराठी नाटक तसेच हिंदी मनोरंजन क्षेत्रातील घडामोडी व मुलाखती गेल्या 6 वर्षापासून महाव्हाईस न्यूजसाठी वृतांकन करीत आहो. सोबतच लेखन, दिग्दर्शन, अभिनय, छायाचित्रण, कथाबोर्ड बनवणे, गायन, नृत्य आणि हिंदी, मराठी मालिकेत कास्टिंग डायरेक्टर म्हणून काम सुरु आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: