रामटेक – राजु कापसे
विद्यासागर कला महाविद्यालय, खैरी ( बिजेवाडा) रामटेक येथे आय.सी.आय. सी.आय. फाउंडेशनच्या वतीने आणि अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष सावित्रीबाई फुले महिला अध्ययन व रोजगार मार्गदर्शक केंद्र, अर्थशास्त्र विभागाच्या संयुक्त विद्यमाने फायनान्शियल लिटरसी आणि रोजगार मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या एक दिवसीय कार्यशाळेचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरेश सोमकुवर यांचे हस्ते झाले.
यावेळी आय . क्यू. ए. सी. समन्वयक डॉ. सावन धर्मपुरीवार, आय. सी. आय. सी. आय. फाउंडेशनच्या प्रकल्प अधिकारी ज्योती वैरागडे आणि अभिषेक सिंग तसेच अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. विलास जायभाये मंचावर उपस्थित होते. प्रकल्प अधिकारी ज्योती वैरागडे आणि अभिषेक सिंग यांनी या कार्यशाळेत आर्थिक साक्षरता तसेच स्वयंरोजगार आणि कौशल्य विकास या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. सावन धर्मपुरीवार यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. विलास जायभाये यांनी तर आभार डॉ .रवींद्र पानतावणे यांनी मानले. कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व प्राध्यापकवृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सहकार्य केले. या कार्यशाळेत महाविद्यालयातील 150 विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग नोंदविला.