Thursday, September 12, 2024
spot_img
Homeराज्यरामटेक कृषी उत्पन्न बाजार समितीची वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन...

रामटेक कृषी उत्पन्न बाजार समितीची वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन…

रामटेक – राजु कापसे

रामटेक कृषी उत्पन्न बाजार समितीचे वार्षिक सर्वसाधारण सभा राखी तलाव सेलिब्रेशन हॉल येथे पार पडली. माजी मंत्री सुनील बाबू केदार यांच्या अध्यक्षतेखाली आजच्या वार्षिक सर्वसाधारण सभा तसेच शेतकरी मार्गदर्शन व प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन सभापती सचिन किरपान यांनी केले.

ना भूतो ना भविष्यअसे काम सभापती सचिन किरपाण तसेच त्यांचे संचालक मंडळ हे मागील एक वर्षात करत आहेत.आजच्या या कार्यक्रमात विशेष आकर्षण म्हणून विविध प्रकारचे लकी ड्रॉ ठेवण्यात आलेले होते. हमाल, आडतिया, शेतकरी, व्यापारी यांच्या लकी ड्रॉ करून आजच्या या कार्यक्रमाची सुरुवा झाली.

पाहुण्यांच्या आगमनानंतर छोट्याशा व्हिडिओ क्लिप च्या माध्यमातून सचिन किरपान तसेच संचालक मंडळ व कर्मचारी यांनी केलेल्या चांगल्या कामाची माहिती देण्यात आली. त्यानंतर काही मान्यवर लोकांचा सत्कार या कार्यक्रमात करण्यात आला.

सचिन किरपान तसेच त्यांच्या संचालक मंडळ यांनी मागील एक वर्षातकिती जोमात काम केली याची प्रचिती प्रत्येक पाहुणे मंडळाच्या भाषणातून होत होती.सर्व पाहुणे मंडळींनी आपल्या भाषणातून सचिन किरपाण यांची स्तुतीच केली.

आजच्या या कार्यक्रमात माजी मंत्री सुनील बाबू केदार, माजी मंत्री राजेंद्रजी मुळक, उबाठा चे नेते विशाल बरबटे, दूधराम सव्वालाखे, जिल्हा परिषद अध्यक्ष कोकाटे मॅडम ,माजी सभापती कलाताई ठाकरे तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते.

Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
मी, राजू कापसे रा, रामटेक जि, नागपूर येथील रहिवासी असून मी पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 30 वर्षा पासून आहे. महाव्हाईस न्यूज च्या मुख्यकार्यकारणी व्यवस्थापन संघाचा सदस्य आहे, जेव्हापासून महाव्हाईस न्यूज ची सुरुवात झाली तेव्हापासून रामटेक तालुक्यातील काम सांभाळत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: