बाळापूर – सावकारी कायदा अंतर्गत 2010 पासुन अवैध सावकारी प्रकरण चालु असुन १२ एकर शेती अवैध सावकराकडे अडकली असुन बाळापूर येथील साहाय्यक निबंधक कार्यालया समोर सावकारी पिडीत सुनीता ताथोड यांनी काल दि ३० जुलै पासुन आमरण उपोषण सुरु केले.
अवैध सावकारा कडुन १२ एकर जमीन परत देण्यात यावी व न्याय मिळावा अवैध सावकाराला बाळापूर येथील साहाय्यक निबंधक कार्यालय हे हेतुपुरस्परपणे सावकारांना संरक्षण देण्याचे आणि सावकारी पिडीत सुनीता ताथोड यांना आत्महत्येस प्रवृत्त करण्याचे काम याठिकाणी करत आहे असे मत ताथोड यांनी व्यक्त केले असून.
याबाबत साहाय्यक निबंधक यांची सुध्दा चौकशी करण्यात यावी.तसेच अवैध सावकाकडुन जमिन परत मिळावी अशी मागणी त्यांची आहे याबाबत सावकार पिडीत असलेल्या सुनीता ताथोड यांनी बाळापूर येथील साहाय्यक निबंधक कार्यालया समोर आमरण उपोषणला सुरुवात केली आहे .न्याय मिळेपर्यंत मी उपोषण मागे घेणार नाही असे मत सुनिता ताथोड यांनी व्यक्त केले.