भंडारा – सुरेश शेंडे
दिनांक ०८/०७/२०२४ ला भंडारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या विस्तारीत कार्यकारीणीची बैठक जिल्हाध्यक्ष, श्री. नानाभाऊ पंचबुध्दे, माजी आमदार मा.श्री. राजेंद्र जैन व प्रदेश महासचिव श्री. धनंजय दलाल यांच्या मार्गदर्शनात व प्रमुख उपस्थितीत घेण्यात आली.नुकताच अर्थसंकल्पीय अधिवेशनात उपमुख्यमंत्री ना.श्री. अजितदादा पवार यांनी विविध योजना राबवून समाजातील स्त्रीयांकरीता लाडकी बहीण, प्रशिक्षणार्थी युवकांना कार्यप्रशिक्षणात दरमहा विद्यावेतन देण्यात येईल असे जाहीर केले, ओबीसी आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलींना चालू वर्षापासून अभियांत्रिकी, वास्तुशास्त्र, फार्मसी मेडीकल, शेतीविषयक सर्व व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी शैक्षणिक आणि परीक्षा शुल्काची संपुर्ण प्रतिपुर्ती करणार असे जाहीर केले.
वर्षाला तीन सिलिंडर मोफत राज्यातील ४४ लाख शेतक-यांना मोफत वीजपुरवठा करणार अशा प्रकारच्या योजनांची माहिती श्री. धनंजय दलाल यांनी दिली व जिल्हाध्यक्ष नाना पंचबुध्दे यांनी पक्ष संघटना व बुथ कमिट्या मजबुत करण्यासाठी जिल्हा परीषद सर्कल निहाय बैठका घेण्याच्या सुचना पदाधिका-यांना दिल्या. माजी आमदार राजेंद्र जैन यांनी कार्यकर्त्याना मार्गदर्शन करतांनी मा. खा.प्रफुलभाई पटेल यांचे हात बळकट करण्यासाठी आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांच्या पाठीशी राहुन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांनी महायुतीच्या उमेदवारांना निवडून आणण्याच्या निर्देश कार्यकर्त्याना दिले.
तसेच महाराष्ट्र शासनाच्या विविध योजना सामान्य जनतेपर्यत पोहचविण्याचे काम कार्यकर्त्यांनी करावे अशा प्रकारच्या सुचना त्यावेळी केल्या. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असा पक्ष आहे की सर्वसामान्य कार्यकर्त्यांना योग्य ते पद देऊन मान सन्मान दित्या जातो. पक्षातील कार्यकर्त्यांनी प्रफुल भाई पटेल यांच्या नेतृत्वात पक्ष वाढविण्याचे काम करावे जेणे करून आगामी विधानसभा ,नगरपरिषद निवडणूकामध्ये विजयी संपादन करता यईल असे ते सभेला मार्गदर्शन करतानी म्हणाले. याप्रसंगी प्रमुख उपस्थितांमध्ये श्रीमती सरिता मदनकर, गटनेता अविनाश ब्राम्हणकर,
यशवंत सोनकुसरे, त्रिवेणी पोहरकर, रत्नमाला चेटुले, संजना वरकडे, रितेश वासनिक, लोमेश वैद्य, विजय सावरबांधे, बालु चुन्ने, सदाशिव ढेंगे, धनेंद्र तुरकर, नागेश वाघाये, धनु व्यास, अंगराज समरित, बाबुराव बागडे, विनयमोहन पशिने, शेखर (बाळा) गभने, आशिष दलाल, किर्ती गणविर, हेमंत महाकाळकर, शरद मेश्राम, राहुल निर्वाण, राजु सलाम पटेल, महादेव पचघरे, आनंद मलेवार, मुश्ताक हाजी सलाम, प्रेमसागर गजभिये, सोमेश्वर भुरे, भीमराव आडकीने, गणेश मलेवार, राजेश वासनिक, चेतन बांडेबुचे, शैलेश गजभिये, बबन पिलारे,
विष्णु कढीखाये, प्रशांत मेश्राम, जयशिला भुरे, मंजुषा बुरडे, जयश्री मेश्राम, निलिमा गाढवे, अर्चना देंगे, निशा राऊत, मदन भुरले, सुधन्वा चेटुले, सुभाष तितिरमारे, रुपेश खवास, लोकेश खोब्रागडे, लोकेश नगरे, मनिष वासनिक, गणेश बाणेवार, भोजराज वाघमारे, धनंजय ढगे, हरिष तलमले, श्रीराम ठाकरे, लंकेश मुंडले, हरीराम भोंगाडे, संजय वरगंटीवार, हितेश सेलोकर, निरज शहारे, विलास खांदाडे, अमूद रामटेके, ओमप्रकाश चव्हाण, किर्ती कुंभरे, रुपाताई आंबेडारे, संगिता चव्हाण, गीता मेश्राम, जया भुरे, राजेन्द्र ढबाले, सुमित शामकुवर,
भारत लांजेवार, प्रदीप सुखदेवे, उमेश ठाकरे, राजु सतदेवे, राजु साठवणे, राजेश निंबेकर, जितेंद्र बौद्रे, अश्विन बांगडकर, विकेश मेश्राम, संजय रामटेके, स्नेहल रोडगे, साहिल रामटेके, पियुष गजभिये, सुनिल टेंभुर्णे, उत्तम कळपाते, जुमाला बोरकर, रेणुका धकाते, संध्या बोदेले, ज्योती टेंभुर्णे, हर्षिला कराडे, प्रेम तुमसरे, अमन मेश्राम, बंडु येलमुले, विक्रम उजवणे, वामन चुटे, चंद्रकांत कोहाड, संजय बोंदरे, प्रभाकर बोदेले, संजय लांजेवार, शालिक कागदे, ईश्वर नंदेश्वर, सुमीत पाटील, अरविंद येळणे, शाहरुख शेख, अरुण अंबादे व फार मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.