Saturday, October 19, 2024
Homeराज्यआमदार, खासदारांच्या हस्ते मोगरकसा वन्यजिव भ्रमंती चे औपचारीक उद्घाटन...

आमदार, खासदारांच्या हस्ते मोगरकसा वन्यजिव भ्रमंती चे औपचारीक उद्घाटन…

रामटेक – राजु कापसे

मोगरकसा-मंगरली कन्हार्वेशन रिझर्व्हच्या मोगरकसा येथील वन्यजीव भ्रमंती (सफारी) चे काल गुरूवार दि.२० जुन ला खासदार शामकुमार बर्वे, आणि आमदार आशिष जैस्वाल यांचे हस्ते औपचारीक उद्घाटन पार पडले. या प्रसंगी श्रीमती. ए. श्रीलक्ष्मी (भा.व.से.) मुख्य वनसंरक्षक नागपूर वनवृत्त नागपूर, डॉ. प्रभुनाथ शुक्ल (भा.व.से.) क्षेत्र संचालक पेंच व्याघ्र प्रकल्प नागपूर, डॉ.भारत सिंह हाडा, (भा.व.से.) उपवनसंरक्षक, नागपूर वनविभाग नागपूर, श्री. हरविर सिंह (भा.व.से.) सहाय्यक वनसंरक्षक रामटेक, श्री. नरेंन्द्र चांदेवार, विभागीय वनाधिकारी म.नि.प.वि.मंडळ तसेच मानद वन्यजीव रक्षक श्री. अविनाश लोंढे व श्री. अजिंक्य भटकर (मा.व.र), सौ. प्रणिती लावंगे नागपूर जिल्हा हे प्रामुख्याने उपस्थित होते.

या प्रसंगी आपल्या दोन शब्दांच्या भाषणात खासदार श्री. शामकुमार बर्वे रामटेक लोकसभा क्षेत्र यांनी या उपक्रमातुन निर्माण होणारा सर्व रोजगार हा स्थानिकांना मिळणार असुन वनविभागाचे आभार व्यक्त केले. आमदार श्री. आशिष जैस्वाल रामटेक विधानसभा क्षेत्र यांनी पायाभुत सुविधांची तसेच पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी पर्यटक निवास क्षेत्र आकर्षक करावे असे आर्वजुन सांगितले. पर्यटकांकरीता मोगरकसा येथे निवासासाठी टेन्टची व्यवस्था करण्यात आली असुन काही दिवसातच ते सुरू होणार आहे.

याची पर्यटकांनी नोंद घ्यावी. कार्यक्रमाचे सफल नियोजन श्री.डॉ.भारत सिंह हाडा यांच्या मार्गदर्शनाखाली, श्री. हरविर सिंह, सहायक वनसंरक्षक रामटेक व श्री ज्ञानेश्वर वाघ वनपरिक्षेत्र अधिकारी पवनी (प्रा.) यांच्या अधिनिस्त असलेल्या वनपाल, वनरक्षक कर्मचारी यांच्या सहकार्याने करण्यात आले.

या प्रसंगी या कार्याक्रमाला परिसरातील देवलापार पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्री. पाटील, देवलापार चे वनपरीक्षेत्र अधिकारी श्री. आर.एस. पाटील, रामटेक चे वनपरीक्षेत्र अधिकारी अनील भगत, अप्पर तहसिलदार देवलापार श्री. प्रेमकुमार आडे , जि.प. सदस्य श्री हरिष उईके , पंचायत समिती सभापती रामटेक श्री. चंद्रकांत कोडवते, जि.प.सदस्या सौ. शांताबाई कुमरे, सरपंच (सालई), सरपंच (टांगला), सरपंच (पवनी), सरपंच (हिवरा बाजार) तसेच ईतर मान्यवर उपस्थित होते.

Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
मी, राजू कापसे रा, रामटेक जि, नागपूर येथील रहिवासी असून मी पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 30 वर्षा पासून आहे. महाव्हाईस न्यूज च्या मुख्यकार्यकारणी व्यवस्थापन संघाचा सदस्य आहे, जेव्हापासून महाव्हाईस न्यूज ची सुरुवात झाली तेव्हापासून रामटेक तालुक्यातील काम सांभाळत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: