Monday, July 22, 2024
spot_img
Homeराज्यअमरावती | शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी नितीन कदम यांनी घेतली...

अमरावती | शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी नितीन कदम यांनी घेतली भेट…

आगामी बडनेरा विधानसभा निवडणुकी संदर्भात सविस्तर चर्चा

नव राजकीय समीकरण समोर येण्याची शक्यता

अमरावती – विधानसभा निवडणुकीच्या हालचालींना आता वेग येत आहे. महाविकास आघाडीतील नेत्यांची विधानसभा निवडणुकीबाबत स्ट्रॅटेजी ठरलेली असताना आता मित्रपक्षांनी कंबर कसली आहे.आगामी काळात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू होणार आहे दरम्यान बडनेरा विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकीबाबत चर्चेकरिता संकल्प शेतकरी संघटनेचे अध्यक्ष नितीन कदम यांनी शरदचंद्रजी पवार यांची सिल्वर ओक या निवासस्थानी भेट घेतली.

या भेटीदरम्यान अनेक राजकीय तर्कवितर्क लढवले जात आहे. सविस्तरपणे चाललेल्या या बैठकीत निवडणुकीच्या नियोजनात्मक उपाययोजना व महाविकास आघाडीची व्यापक भूमिका यावर सविस्तर सकारात्मक चर्चा करण्यात आली. त्याचाप्रमाने आधुनिक तंत्रज्ञानयुक्त शेती प्रणाली व बडनेरा शहर व ग्रामीण भागातील भविष्यातील औद्योगिक धोरण याबाबत पवार यांनी सूचना केल्या.

गेल्या काही दिवसापूर्वी नितीन कदम यांनी आपल्या अभिष्टचिंतन सोहळा व कार्यकर्ता मेळावा कार्यक्रमादरम्यान आपली बडनेरा विधानसभा मतदारसंघातील दावेदारी जाहीर केली होती. तसेच महाविकास आघाडी कडून नितीन कदम हेच उमेदवार राहतील अशी चर्चा ही मतदारसंघात बघायला मिळत होती. दरम्यान आता नितीन कदम यांनी शरदचंद्रजी पवार यांची भेट घेतल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या राजकीय भेटी दरम्यान शरदचंद्रजी पवार यांनी नितीन कदम यांना शुभेच्छा दिल्या.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: