मुंबई – गणेश तळेकर
आपल्या सामाजिक कार्यातून वेगवेगळे उपक्रम राबविणारा व सर्वांच्या मदतीसाठी सदैव तत्पर असणारा अभिनेता व कार्यकर्ता म्हणून सुशांत शेलार यांची ओळख आहे. विविध सामाजिक कामात कायम अग्रेसर असणाऱ्या सुशांत यांनी करोनाचा काळ असो अथवा चिपळूणची पूर परिस्थिती गरज असेल त्याला आपल्यापरीने मदतीचा हात दिला आहे. ‘चिरायू’च्या माध्यमातूनही त्यांनी पडद्यामागच्या अनेक कलावंतांचा सन्मान, मनोरंजन सृष्टीतील कलाकारांसाठी मराठी बॉक्स क्रिकेट लीग, वैद्यकीय मदत असे अनेक उपक्रम सुशांत यांनी राबविले आहेत.
मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या आदेशाने आणि खासदार डॉ. श्रीकांतजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना पक्षाचा सचिव आणि शिव चित्रपट सेनेचे अध्यक्ष सुशांत शेलार यांनी पडद्यामागच्या कलाकारांसाठी छत्रीवाटपाच्या कार्यक्रमाचे आयोजन नुकतेच केले. हातावर पोट असणाऱ्या कलावंतांना काही गोष्टी परवडत नाही. असा कलावंतांना भेट म्हणून छत्री देण्याचे काम आम्ही आमच्या शिवसेना पक्षातर्फे केले आहे.
मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांतजी शिंदे यांच्या मार्गर्दर्शनातून भविष्यात अनेक चांगले स्तुत्य उपक्रम राबवण्याचा मानस सुशांत शेलार यांनी यावेळी बोलून दाखविला.