Friday, July 12, 2024
spot_img
HomeMarathi News TodayMurtizapur | विधानसभा निवडणुकीपू्वी मतदार संघात हरिष पिंपळे यांचं मिशन डॅमेज कंट्रोल…तर...

Murtizapur | विधानसभा निवडणुकीपू्वी मतदार संघात हरिष पिंपळे यांचं मिशन डॅमेज कंट्रोल…तर आघाडीचे उमेदवार मोठ्या ताकदीने मैदानात…

Murtizapur :राज्यात विधानसभा निवडणुका आक्टोंबर मध्ये लागण्याची शक्यता आहे, यासाठी निवडणूक आयोगाने मोठी तयारी सुरू केल्याचे सूत्रांची माहिती आहे. तर मुर्तिजापूर विधानसभा मतदासंघातही हालचाली सुरू झाल्या असून मुर्तिजापूरचे विद्यमान आमदार हरिष पिंपळे सुध्दा कामाला लागले आहेत. २०१९ मधील निवडणुकीमध्ये केलेल्या चुका पुन्हा होणार नाहीत याची पुरेपूर काळजी ते घेत आहेत. या वर्षी पक्षाच्या वतीने केलेल्या सर्व्हेत जरी मागे पडत असेल तरी लोकसभा निवडणुकीत त्यांच्या मतदार संघातून आपल्या पक्षाच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी चांगलीच मेहनत घेतली असल्याचे समजते त्यामुळे पुन्हा त्यांना संधी मिळणार आहे असे अनेकांचं मत आहे. मात्र वेळेवर पक्ष काय निर्णय घेईल हे सांगता येणार नाही. तर भाजपा कडून भावी उमेदवारही तिकीटाच्या रांगेत आहेत. त्यामुळे पिंपळे यांना तिकीट मिळविण्यासाठी चांगलीच कसरत करावी लागणार आहे.

हरिष पिंपळे हे तीनदा आमदार झाले मात्र जो विकास आमदार तुकाराम बिडकर यांनी एकाच वेळी केला तेवढा विकास कामे त्यांचेकडून झाले नसल्याने मतदार संघातील मतदार सांगतात त्यामुळेच त्यांच्याबद्दल नाराजी असल्याचं दिसत होत, त्यांची मतदार संघात वेगळीच प्रतिमा त्यांच्या कार्यकर्त्यांनी तयार केली होती. मात्र आता त्यांनी बऱ्याच सुधारणा करत विरोधकांना व पक्षातील नाराज कार्यकर्त्यांना जवळ करण्याचे काम सुरू केले आहे. पण त्यांच्या आजूबाजूचे कार्यकर्ते त्यांना उलटा सल्ला देऊन आलेल्या कार्यकर्त्या विषयी त्यांच्या मनात विष पेरून दिल्याने भाऊ रौद्र रूप धारण करतात. या निवडणूकीत जर हेच कार्यकर्ते भाऊच्या पाठीशी राहिले तर भाऊला निवडणूक फार कठीण जाणार असल्याचे राजकीय विश्लेकांच मत आहे. भाऊ या कार्यकर्त्यांचा यावेळी बंदोबस्त करतील का? असा प्रश्न भाजपच्या सच्च्या कार्यकर्त्याला पडला आहे.

समाजसेवेचा बुरखा पांघरून ठेकेदारीचे लायसन्स नसलेले इतर पक्षाचे पदाधिकारी तर भाऊच्या दरबारात नेहमीच हजर असतात. भाऊने मागेल त्याला काम देण्याचा सपाटा सुरू केला असल्याने त्यांच्या पासून दुरावलेले कार्यकर्ते पुन्हा जवळ येत आहेत, मात्र त्यांच्या आताचे कार्यकर्ते त्यांचा ठावठिकाणा लागू देत नसल्याचे समजते. मागील आठवड्यात नैसर्गिक आपत्तीमुळे तालुक्यातील दोन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता अश्यावेळी त्यांनी तात्काळ मदत करून शेतकऱ्यांच्या परिवाराला दिलासा देण्याचे काम केले. त्यामुळे त्यांच्या कामाचं कौतुक ही झालं. असे चांगल्या कामाची लोकांना प्रतीक्षा आहे पण शहरातील पाणी प्रश्न अजूनही जैसे थे असल्याने मुर्तिजापूरकर नाराज असल्याचे समजते.

मागील निवडणूकीत प्रतिस्पर्धी पक्ष वंचित पक्षाच्या उमेदवाराने चांगलीच फाईट दिली होती तर यावेळीही वंचित कडून चांगला उमेदवार देणार असल्याचे समजते सोबतच मागील निवडणूकीत ४२ हजारांपेक्षा जास्त मत घेणारे रवी राठी सुध्दा मैदानात आहेत. त्यांनाच यावेळी महाविकास आघाडीचे तिकीट मिळणार असल्याचं त्यांना खात्री आहे, त्यासाठी ते मतदार संघात प्रचंड मेहनत घेत आहेत. तेही त्यांच्या झालेल्या चुका दुरुस्त करण्याचे काम करीत आहे. मात्र हरिष भाऊला भीती फक्त एकाच माणसाची आहे ती म्हणजे सम्राट डोंगरदिवे यांची जर सम्राटभाऊ यांना आघाडीचे तिकीट मिळाले तर भाऊ चे काही खरे नाही. असे मतदार संघातील मतदार म्हणतात. सम्राट भाऊ हे सुद्धा मतदार संघात सक्रिय झाले असून त्यांनी आपल्या मतदार संघात अतिवृष्टीमुळे घराचे नुकसान झालेल्या गरिबांना नगदी मदत करत मतदार संघात पुन्हा एन्ट्री घेतली. त्यांची मतदारसंघात दिलदार माणूस म्हणून ओळख असल्याने ते लवकरच मतदारांना आपल्या जवळ करण्यात तरबेज आहेत. त्यांच्याकडे मतदार संघासाठी मोठं व्हिजन आहे, मात्र पक्ष कुणाला तिकीट देणार हे निश्चित जरी नसले तरी सम्राट भाऊ अपक्ष जरी लढले तरी निवडून येवू शकतात असे मतदारसंघातील अनेकांचं मत आहे.

Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: