अकोला – संतोषकुमार गवई
अकोला – जिल्हा बालकामगारमुक्त करण्यासाठी सहायक कामगार आयुक्त कार्यालयातर्फे जनजागृती करण्यात येत आहे. विविध आस्थापनांमध्ये ‘येथे बालकामगार काम करीत नाही’ अशा आशयाचे स्टीकर लावण्यात येत असून, प्रत्येक आस्थापनेने असे फलक लावण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
जिल्ह्यात दि. 12 जून रोजी बालकामगारविरोधी दिन साजरा होणार आहे. त्यानिमित्त सहायक कामगार आयुक्त रा. रा. काळे, सरकारी कामगार अधिकारी आ. शि. राठोड यांच्याकडून पूर्वतयारीचा आढावा घेण्यात आला. त्यानुसार जिल्ह्यात आस्थापनांमध्ये बालकामगार काम करत नसल्याची पाटी प्रत्येक दुकानात असावी, असे निर्देश देण्यात आले.
त्याचप्रमाणे, नागरिकांना कुठेही बालकामगार आढळून आल्यास नजिकच्या पोलीस ठाण्यात तक्रार देण्याचे आवाहन दुकाने निरीक्षक वि. श्री. जोशी, कि. तु. राठोड, यो. अ. मालोकार यांनी केले आहे.