Akola Loksabha : दुसऱ्या टप्प्याच्या मतदानाला काही दिवस शिल्लक राहिले असून प्रचाराची रणधुमाळी जोरात सुरू आहेय…21 एप्रिलला अकोल्यात भाजपचे उमेदवार अनुप धोत्रे यांच्या प्रचारार्थ उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची सभा आयोजित करण्यात आली होती मात्र योगी यांनी या सभेकडे पाठ फिरवली आहेय..
अकोल्यातील अकोला क्रिकेट क्लब मैदानावर होणारी त्यांची 21 एप्रिल ची सभा रद्द करण्यात आली आहे..या सभेकरिता गेल्या तीन दिवसांपासून भाजप तर्फे मोठी जय्यत तयारी करण्यात आली होती, मात्र एन वेळेवर ही सभा रद्द करण्यात आली आहेय…
भाजप उमेदवाराच्या प्रचारार्थ अद्यापही भाजपचे कोणतेही मोठे नेते अकोल्यात आले नाही हे विशेष…योगी आदित्यनाथ यांची ही सभा कोणत्या कारणाने रद्द करण्यात आली याच स्पष्ट उत्तर भाजपकडून मिळालं नसून योगी आदित्यनाथ यांनी बऱ्याच सभा रद्द केल्या असल्याचा कारण समोर येत आहेय…