Friday, July 12, 2024
spot_img
Homeराज्यजिजामाता विद्यालयाच्या नया अंदुरा वतीने निंबा फाटा येथे मतदार जनजागृती मोहीम...

जिजामाता विद्यालयाच्या नया अंदुरा वतीने निंबा फाटा येथे मतदार जनजागृती मोहीम…

अकोला – जिजामाता विद्यालय, कनिष्ट महाविद्यालय व एच एस सी व्होकेशनल नया .ता.बाळापुर च्या वतीने निंबा फाटा येथे दिनांक 19/04/2024 ला अंतर्गत मतदार जनजागृती मोहीम राबविण्यात आली.विद्यालयातील विद्यार्थीनींनी “मतदार जनजागृती पथनाट्य ” सादर करून मतदार जनजागृती केली.

लोकशाही मतदान पध्दती,मतदाराचे हक्क-अधिकार व मतदार राजाच्या मनातील शंकांचे निराकरण करून मतदान करण्याचे आवाहन पथनाट्याच्या सादरीकरणातुन केले.निवडणूक आयोग भारत सरकार यांच्या मतदार जनजागृती कार्यक्रम अंतर्गत आचारसंहिता लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना पथनाट्याकरीता श्री.व्ही. डी.कोवेसर यांनी मार्गदर्शन केले.

विद्यालयाचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य मा.श्री.आर.बी.भगतसर यांनी निंबा फाटा परिसरातील व्यावसायिक, प्रवासी,रहिवासी व अन्य नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन केले. यावेळी जिजामाता विद्यालय,कनिष्ठ महाविद्यालय व एच.एस.सी.व्होकेशनलचे सर्व प्राध्यापक, सर्व शिक्षक-शिक्षिका व सर्व शिक्षकेतर कर्मचारीवर्ग उपस्थित होते. तसेच उरळ पोलीस स्टेशनचे अधिकारी, महसूल विभाग अधिकारी व इतर नागरिकांनी मोलाचे सहकार्य केले.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: