Murtizapur : गेल्या 25 वर्षांपासून दुर्लक्षित असलेल्या जितापूर ते शेलू बोंडे मधील रस्त्याची चाळणी झाली असून पायदळ चालणाऱ्यालाही व्यवस्थित चालत येत नाही. त्यामुळे बरेच नागरिक पर्यायी रस्त्याचा वापर करतात. पण काही गावांना पर्यायी मार्ग नसल्याने मजबुरीने याच मार्गाचा अवलंब करतात. या रस्त्याचे काम बरेच दिवसांपासून मंजूर झाले मात्र निवडणुकीकरिता या भागात मत मागण्यासाठी जावे लागते म्हणून प्रचारच्या तोंडावर या रस्त्याचे काम सुरु केले. परंतु या रस्त्याचे डांबरीकरण थातूर मातुर करून हि वेळ मारून नेण्याचे काम या भागातील लोक प्रतिनिधी करताहेत. असा आरोप येथील नागरिक करताहेत.
या रस्त्यावर केलेले डांबरीकरण हातने उखडत असल्याचे व्हिडीओ समाज माध्यमांवर फिरत आहे. तरी सार्वजनिक विभागाला जाग आली नसून संबंधीत विभाग झोपेच सोंग घेत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. या रस्त्याच्या काम ज्याच्या कडे आहे त्या ठेकेदाराने लोकप्रतिनिधीला चांगल कमिशन दिल्याचा नागरिकांचा आरोप आहे. या भागातील जिल्हा परिषद सदस्याला आमदारकीचे भूत लागल्याने तो सध्या कोमात आहे. तर या भागातील नागरीकांचा कोणीही त्यांचा वाली नसल्याची खंत नागरिकांनी बोलून दाखविली. तर सत्ताधारी पक्षाचे उमेदवार जर मत मागायला आमच्याकडे आले तर त्याचं वेगळ्या पद्धतीने स्वागत करू असे येथील संतप्त झालेले नागरिक करीत आहे.
गेल्या वर्षी मोठा गाजावाजा करीत रुंदीकरण व दुरुस्तीकरणाचे फलक लावून दिले आणि काही ठिकाणी थातूर मातूर डागडुजी करून घेतली आणि रोड जैसे थे. गेल्या अनेक दिवसांपासून या रोडवरील ग्रामस्थांच्या तक्रारी आहेत मात्र संबंधित बांधकाम विभाग याकडे दुर्लक्ष करीत आहे.