नांदेड – रत्नाकर जाधव
ग्रामीण कथाकार तथा पत्रकार राम तरटे यांना पुणे येथील अत्यंत प्रतिष्ठेचा बंधुता शब्दक्रांती साहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे.बंधुता लोक चळवळीच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त पुणे येथे दिनांक १२ एप्रिल २०२४ रोजी एस. एम. जोशी सभागृह नवी पेठ पुणे येथे संपन्न होणाऱ्या ऐतिहासिक पहिल्या विश्वबंधुता साहित्य संमेलनात संमेलन अध्यक्ष जेष्ठ विचारवंत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते आणि चंद्रकांत दळवी,
डॉक्टर विजय ताम्हणे, प्रा. सुभाष वारे, प्रख्यात कवी प्रा. चंद्रकांत दादा वानखेडे, एडवोकेट जयदेव गायकवाड, नलिनी व्यंकटराव यांच्या प्रमुख उपस्थितीत राम तरटे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
अशी माहिती बंधुता लोक चळवळीचे संस्थापक बंधुताचार्य प्रकाश रोकडे यांनी दिली आहे.बंधूता शब्दक्रांती साहित्य पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल राम तरटे यांचे पत्रकारिता,साहित्य व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.