Telangana | तेलंगणातील सिकंदराबाद कॅन्टोन्मेंट सीटच्या BRS आमदार 33 वर्षीय लस्या नंदिता यांचे दु:खद निधन झाले आहे, मागील वर्षी फेब्रुवारीमध्ये त्यांचे वडील आमदार सयन्ना यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आणि आता वर्षभरानंतर त्यांची मुलगी लस्या नंदिता हिचाही मृत्यू झाला आहे.
सिकंदराबाद कॅन्टोन्मेंट, तेलंगणा येथील भारत राष्ट्र समिती (BRS) आमदार लस्या नंदिता यांचा रस्ता अपघातात मृत्यू झाला. अनियंत्रित कार डिव्हायडरला धडकल्याने हा अपघात झाला. ३३ वर्षीय लस्या सिकंदराबाद कँटमधून आमदार होत्या. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनियंत्रित कार दुभाजकावर आदळल्याने हा अपघात झाला. बीआरएस प्रमुख के. चंद्रशेखर राव यांनी नंदिता यांच्या निधनावर तीव्र दुःख व्यक्त केले आहे. बीआरएसचे कार्याध्यक्ष केटी रामाराव यांनीही आमदाराच्या निधनावर शोक व्यक्त केला.
आज पहाटे आमदार सिकंदराबादहून सदाशिवपेठला जात असताना हा अपघात झाल्याचे पोलिसांनी सांगितले. चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार दुभाजकाला धडकली. या अपघातात आमदाराचा जागीच मृत्यू झाला, तर चालक गंभीर जखमी झाला. त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मृतदेह शवविच्छेदनासाठी पाटनचेरू एरिया हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आला आहे. नंतर त्यांना त्यांच्या चिक्कडपल्ली येथील निवासस्थानी नेण्यात येईल. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
मुख्यमंत्री रेड्डी यांनी शोक व्यक्त केला
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी नंदिताच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. ते म्हणाले, ‘कॅन्टच्या आमदार लस्या नंदिता यांच्या निधनाने मला मोठा धक्का बसला आहे. नंदिताचे वडील दिवंगत सयन्ना यांच्याशी माझे जवळचे नाते होते. गेल्या वर्षी याच महिन्यात त्यांचे निधन झाले. नंदिता नाही राहिल्याचं खूप वाईट वाटतं. त्याच महिन्यात त्यांचाही अचानक मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबीयांप्रती माझ्या मनापासून संवेदना, त्यांच्या आत्म्याला शांती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना. ,
Telangana | BRS MLA from Secunderabad Cantonment, Lasya Nanditha died in a car accident at Patancheru ORR this morning when her car hit a divider.
— ANI (@ANI) February 23, 2024
BRS chief K. Chandrashekar Rao condoled her demise. pic.twitter.com/B9jZRRDr0P