Tuesday, September 17, 2024
Homeराज्यरामटेक | घर जळून ८.५ लाखाचे नुकसान...

रामटेक | घर जळून ८.५ लाखाचे नुकसान…

रामटेक – राजु कापसे

स्थानिक महात्मा फुले वार्डातील भोजराज नागों नागपूरे वय 50 वर्ष यांचे घर पूर्णत जळून खाक झाले. यात नित्यपयोगी साहीत्य 2 लाख, नगदी रोख 50 हजार व कौल फाटयाचे घराचे नुकसान 6 लाख असे एकूण साडे आठ लाख रूपयांचे एकदम गरीब परिवारचे नुकसान झाले आहे. आगीचे कारण शार्ट सर्किट मुले होउ शकते असा अंदाज आहे.

घटना 21 फरवरीच्या दुपारी 4 वाजताची आहे। तहसिलदार रमेश कोळपे यांच्या मार्गदर्शनात पटवारी निलेश ठाकुर यांनी पंचनामा केला. त्यात 8.5 लाखाचे नुकसान झाल्याचे सांगीतले. सुदैवाने घरी कोणीही नसल्याने जिवित हानी झाली नाही.

आग लागताच समयसूचकता दाखवत घराशेजारील लोकांनी स्वत व अग्नीशमनच्या सहाय्याने आग विझवली. काही लोकानी तुरंत घरातील सिलेंडर बाहेर काढले. घरच्या शेजारी लागून जूनी कौल फाट्यांचे घर होते. वेळीच नियंत्रण झाले नसते तर अनेक घरे जळण्याची संभावना होती

Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
मी, राजू कापसे रा, रामटेक जि, नागपूर येथील रहिवासी असून मी पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 30 वर्षा पासून आहे. महाव्हाईस न्यूज च्या मुख्यकार्यकारणी व्यवस्थापन संघाचा सदस्य आहे, जेव्हापासून महाव्हाईस न्यूज ची सुरुवात झाली तेव्हापासून रामटेक तालुक्यातील काम सांभाळत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: