अकोला – संतोषकुमार गवई
दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्हयातील पशुधनाला भविष्यात चारा टंचाई भासू नये, यासाठी अकोला जिल्ह्यातून जिल्ह्याबाहेर चारा वाहतूक करण्यास मनाई करण्यात आली आहे. तसा आदेश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी निर्गमित केला.
मागील वर्षीच्या पेरणी अहवालानुसार जिल्ह्यामध्ये 9 लक्ष 55 हजार 456 मे. टन चारा उपलब्ध आहे. जिल्ह्याबाहेर चारा वाहतुकीवर बंदी आणल्यास भविष्यात चारा टंचाई भासणार नाही असा अभिप्राय पशुसंवर्धन उपायुक्त यांनी दिला. त्यानुसार हा आदेश काढण्यात आला. तो दोन महिन्याच्या कालावधीसाठी अंमलात राहील.