Wednesday, July 24, 2024
spot_img
Homeराज्यमूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघात वंचितची ताकद वाढली…माजी शिवसेना तालुकाध्यक्ष संगीत कांबे वंचित मध्ये...

मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघात वंचितची ताकद वाढली…माजी शिवसेना तालुकाध्यक्ष संगीत कांबे वंचित मध्ये प्रवेश…

akl-rto-3

मूर्तिजापूर : तालुक्याच्या राजकारणात आपली वेगळीच छाप सोडणारे व विधानसभा निवडणुकीत भाजप पक्षाला भरीव मदत करणारे मराठा समाजाचे व तसेच शिवसेनेचे माजी तालुकाध्यक्ष संगीत कांबे यांना आज शिवसेना सोडून वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला आहे. आज अकोल्यात वंचीत चे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थित हा पक्ष प्रवेश सोहळा पार पडला असून यावेळी मराठा समाजाचे तसेच वंचितचे पदाधिकारी उपस्थित होते.

जशी जशी लोकसभा निवडणूक जवळ येत आहे तशे तशे जिल्ह्याचे राजकीय वातावरण बदलत आहे. तर येणाऱ्या निवडणुकीत वंचित चे पारडे आणखी जड आणि मजबूत होताना दिसत आहे. कारण जिल्ह्यातील मराठा समाज त्यांच्याकडे आकर्षित होताना दिसत आहे. सोबतच काही जिल्हा परिषद मतदार संघातील रखडलेली कामे पूर्ण झालेली नसल्याने अनेक जण वंचीत मध्ये येण्यास उत्सुक आहेत.

मूर्तिजापूर तालुक्यातील एक मोठा मराठा चेहरा संगीत कांबे वंचितच्या गळाला लागल्याने आता तालुक्यातील मराठे वंचितमधे आणण्याची ताकद संगीत कांबे यांच्यात आहे. सोबत OBC सह इतर समाजाच्या लोकांनाही सामावून घेण्याची ताकद कांबे यांच्यात असल्याने मूर्तिजापूर विधानसभा मतदार संघात वंचित ताकद वाढणार असल्याचे राजकीय तज्ञांचे मत आहे.

Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: