Friday, July 12, 2024
spot_img
Homeराज्यअकोला जिल्ह्याबाहेर चारा वाहतुकीस मनाई...

अकोला जिल्ह्याबाहेर चारा वाहतुकीस मनाई…

akl-rto-3

अकोला – संतोषकुमार गवई

दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्हयातील पशुधनाला भविष्यात चारा टंचाई भासू नये, यासाठी अकोला जिल्ह्यातून जिल्ह्याबाहेर चारा वाहतूक करण्यास मनाई करण्यात आली आहे. तसा आदेश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी निर्गमित केला.

मागील वर्षीच्या पेरणी अहवालानुसार जिल्ह्यामध्ये 9 लक्ष 55 हजार 456 मे. टन चारा उपलब्ध आहे. जिल्ह्याबाहेर चारा वाहतुकीवर बंदी आणल्यास भविष्यात चारा टंचाई भासणार नाही असा अभिप्राय पशुसंवर्धन उपायुक्त यांनी दिला. त्यानुसार हा आदेश काढण्यात आला. तो दोन महिन्याच्या कालावधीसाठी अंमलात राहील.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: