मूर्तिजापूर | तालुक्यातील ताकवाडा या गावात राज्य सरकार महसूलविभागाच्या वतीने वाळू डेपो उभारण्यात आला परवा या डेपोची महसूल मंत्री व अकोल्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे हस्ते सुरुवात करण्यात आली, या कार्यक्रमाला आजी, माजी वाळू तस्कर हजर होते. तर या डेपोचे उभारणी वाळू तस्करी रोखण्यासाठी केली असल्याचे राज्य सरकार म्हणते मात्र, या डेपोच्या कार्यक्रमाला काही तस्करांची उपस्थिती असल्याने खरच तस्करी थांबणार का? असा प्रश्न सामन्यांच्या मनात उपस्थित होतो.
तालुक्यात रेतीचे घाट त्यांनाच दरवर्षी कसे मिळतात? एखाद्या वेळेस दुसर नाव वापरल्या जात असेल, त्यांची आधीच निवड झालेली असते का?, शहराच्या जवळचे घाट आम्हाला आणि बाकीचे दुसऱ्याला असा नियम आहे. त्यापैकी भाऊच्या जवळचे किती असतात?. घाट घेतल्यानंतर महसूल अधिकाऱ्याला घाटावर येण्यास बंदी असते. यांच्यावर कधी आणि कोणतेही कारवाई होणार नाही याची दक्षता घेतली जाते का?. क्षमतेपेक्षा जास्त रेतीचा उपसा, सोबतच रेतीचा उपसा थेट जेसीबीने करून कमी वेळात जास्त माल बाहेर काढतात, एवढच काय तर आपल्या जिल्ह्यातील रेती सोडून अमरावती जिल्ह्यातील रेतीचा उपसा करून आपल्याकडे संकलन करून ठेवतात, एकाच रॉयल्टी वर 2 ते 3 वेळा उपयोग करणे. असे बरेच कामे आहेत ती थांबणार का?. असा प्रश्न सामान्यांना पडत आहेत.
गेल्या 10 वर्षांपासून पासून शहरालगतच्या गावातील रेतीचे घाट कोण घेत होते? नाव कोणाचे आणि त्याचे मागे कोण? मागील चार वर्षापासून वाळूच्या तस्करीमुळे महसूल विभाग बेजार झाला होता असे सत्ताधारी म्हणतात, मग अश्या तस्करांना महसूल विभागाने धडा का शिकवला नाही?. तालुक्यातील घुंगशी, मुंगशी, सांगवा या गावातील घाटावर तर महसूल विभागाचे पूर्ण दुर्लक्षच असते आणि याच घाटावरून सर्वाधिक अमरावती जिल्ह्यातील रेतीचा उपसा मोठ्या प्रमाणात केल्या जाते….(क्रमशः)