न्युज डेस्क – काल सोमवारी ५ फेब्रुवारी ला अर्थसंकल्पीय अधिवेशनात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. यावेळी पंतप्रधान मोदींनी माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचे भाषण वाचून दाखवले आणि म्हणाले की पंडित नेहरू आणि इंदिरा गांधींना वाटत होते की भारतातील लोक कमी हुशार आणि आळशी आहेत.
अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान पंतप्रधान मोदींनी लाल किल्ल्यावर केलेल्या भाषणातील काही उतारे वाचताना पीएम मोदी म्हणाले, “काँग्रेसच्या मानसिकतेमुळे खूप नुकसान झाले आहे. काँग्रेसचा देशाच्या क्षमतेवर कधीच विश्वास नव्हता. ते स्वतःला राज्यकर्ते मानत राहिले आणि जनतेला कमी लेखले. त्या लोकांनी देशातील नागरिकांचा विचार कसा केला? मला माहीत आहे की मी नाव म्हटल्यावर त्या लोकांना टोचल्यासारखे वाटेल.”
1959 मध्ये स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू म्हणाले होते की भारतीयांना सामान्यतः कठोर परिश्रम करण्याची सवय नसते, आम्ही युरोप, जपान, चीन, अमेरिका किंवा रशियाच्या लोकांइतके काम करत नाही. असे समजू नका की ते समुदाय जादूने सुखी झाले आहेत, ते कठोर परिश्रम आणि हुशारकीने सुखी झाले आहेत.
Prime Minister Modi quotes Nehru’s speech from the Red Fort, in which he berates Indians as being lazy…
— Amit Malviya (@amitmalviya) February 5, 2024
This is Congress party’s DNA. Full of self loathing and undermining India’s potential. pic.twitter.com/WU9CFrqlIN
‘सर्व देश विकसित होत आहेत आणि भारत तंत्रज्ञान आणि सामाजिक प्रगतीच्या शर्यतीत उतरत आहे. आपण किती आळशी आहोत आणि दुसरा देश आपल्यापेक्षा चांगला आहे, पण आपण अधिक चांगले करू शकतो’…देश स्वातंत्र्य झाल्यानंतर नव्याने भारताला विकसित करणे खूपच कठीण काम होते. मात्र पंडित जवाहरलाल नेहरूंनी हळूहळू विकासाच्या दिशेने वाटचाल करीत होता. लोकांची भक्कम साथ मिळावी म्हणून 1959 लाल किल्ल्यावरून नेहरूंनी भाषण देतांना नागरिकांना संबोधन करताना वेगळ्या अर्थाने आळशी म्हटल्याचे भाषणावरून समजते. मात्र मोदींनी याचा वेगळा अर्थ लावल्याचा काही राजकीय विश्लेषक सांगत आहे.