Wednesday, July 17, 2024
spot_img
Homeराज्यगोळीबारात जखमी झालेल्या महेश गायकवाड यांच्या दीर्घ आयुष्यासाठी मंत्र जप करून गणपती...

गोळीबारात जखमी झालेल्या महेश गायकवाड यांच्या दीर्घ आयुष्यासाठी मंत्र जप करून गणपती मंदिरात अभिषेक घालण्यात आला…

कल्याण – धीरज घोलप

शिवसेनेचे कल्याण पूर्व शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी पोलीस ठाण्यात गोळीबार केला होता. या गोळीबारात महेश गायकवाड हे गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर ठाण्यातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

उपचारांना योग्य प्रतिसाद दिला जात असुन त्यांच्या तब्येतीमध्ये मोठ्या प्रमाणात सुधार होत असल्याची माहिती मिळत आहे. सोमवारी सकाळी कल्याण लोकसभा खासदार श्रीकांत शिंदे आणि त्यांच्या नातेवाईकांनी महेश गायकवाड यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली.

या निमित्ताने कल्याण परिसरातील नांदिवली – चिंचपाडा या गावातील विविध जाती-धर्माच्या सहकारी मित्र परिवारांनी त्यांच्या कार्यकर्त्यांनी आणि महिलांनी त्यासोबत विभागीय शाखाप्रमुख संतोष माने यांनी महेश गायकवाड यांना दीर्घ आयुष्य मिळण्यासाठी मंत्रजाप करून गणपती मंदिरात अभिषेक घालण्यात आला.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: