Fresh Snowfall Videos : सध्या जम्मू काश्मीर सह हिमाचल प्रदेशातील मोठ्या प्रमाणात हिम वर्षाव सुरु असून पर्यटक या हिमवर्षावाचा आनंद घेत आहेत. जर तुम्हाला हिमवर्षावाचा आनंद घ्यायचा असेल तर तुम्ही वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी जाऊ शकता. गुरुवारी सकाळी वैष्णोदेवी भवनाच्या आसपास त्रिकुट पर्वतावर चांगली बर्फवृष्टी झाली, ज्याचा वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी खूप आनंद घेतला. माता वैष्णोदेवीचा जयजयकार करताना भाविक बर्फवृष्टीचा आनंद लुटताना दिसले.
बुधवारी हलकी बर्फवृष्टी झाली असली तरी गुरुवारी सकाळी चांगलीच बर्फवृष्टी झाली. 2024 सालातील ही पहिली हिमवृष्टी आहे. जम्मू-काश्मीरच्या डोंगराळ भागातही बर्फवृष्टी होत आहे. उत्तराखंडमधील केदारनाथ धाममध्येही चांगली बर्फवृष्टी झाली. त्याचवेळी हिमाचल प्रदेशातही डोंगरावर चांगली बर्फवृष्टी होत असल्याने मैदानी भागात थंडी वाढली आहे. लोक आपापल्या घरात बसले आहेत. प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
हिमाचल-जम्मूमध्ये गेल्या २४ तासांपासून बर्फवृष्टी होत आहे
हिमाचल प्रदेशातील डोंगराळ भागात गेल्या २४ तासांपासून सतत बर्फवृष्टी होत आहे. बुधवारी सकाळपासून बर्फवृष्टी सुरू झाली होती. शिमला आणि मनालीमधील कुफरी आणि खारापठारमध्ये पर्यटकांनी बर्फवृष्टीचा आनंद लुटला. त्याचवेळी मैदानी भागात पावसाने जनजीवन विस्कळीत केले. थंडीमुळे लोक घरात बसले होते.
#WATCH हिमाचल प्रदेश: मनाली में पर्यटक ताजा बर्फबारी का आनंद ले रहे हैं। pic.twitter.com/RLwE9t4UDh
— ANI_HindiNews (@AHindinews) January 31, 2024
मीडिया रिपोर्ट्सनुसार, जम्मू-काश्मीरच्या रामबन आणि अनंतनागमध्ये चांगली बर्फवृष्टी झाली आहे. अनंतनाग जिल्ह्यातील कोकरनाग, कुपवाड्याचा हंदवाडा, बांदीपोराचा गुरेझ, श्रीनगर-लेह महामार्गावरील डोंगराळ भाग, झोजिला पास, बारामुल्ला, गंदरबल, शोपियान, कुलगाम येथे चांगली बर्फवृष्टी होत आहे, त्यामुळे नजारे खूपच सुंदर आहेत.
हिमवृष्टीमुळे हेलिकॉप्टर सेवेवर परिणाम झाला
मीडिया रिपोर्ट्सनुसार, जम्मू-काश्मीरमध्ये बर्फवृष्टीमुळे वाहतुकीवर परिणाम झाला आहे, तर कटरा ते वैष्णोदेवीपर्यंत चालणाऱ्या हेलिकॉप्टर सेवेवरही बर्फवृष्टीमुळे परिणाम झाला आहे. त्रिकुट पर्वतावर हलकी बर्फवृष्टी झाली आणि ढगाळ वातावरण राहिले, त्यामुळे प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून हेलिकॉप्टर सेवा बंद ठेवण्याच्या सूचना दिल्या. बॅटरी अप आणि रोपवे सेवा चालू आहे.
#WATCH | Mata Vaishno Devi Temple in Katra, Jammu and Kashmir received fresh snowfall this morning pic.twitter.com/ecAAXRTEZD
— ANI (@ANI) February 1, 2024
4 फेब्रुवारीपर्यंत चांगल्या हिमवृष्टीचा इशारा
भारतीय हवामान खात्याने (IMD) 4 फेब्रुवारीपर्यंत देशातील डोंगराळ राज्यांमध्ये बर्फवृष्टी होण्याची शक्यता वर्तवली आहे. हलकी ते जोरदार हिमवृष्टी होऊ शकते. डोंगरावर बर्फवृष्टी झाल्यामुळे मैदानी भागातही पावसाची शक्यता आहे. 10 फेब्रुवारीनंतर हवामानात बदल होऊ शकतो, परंतु 10 फेब्रुवारीपर्यंत संपूर्ण देश थंडी, पाऊस आणि बर्फवृष्टीच्या गर्तेत राहील.