अकोला : अकोल्यात काल परवा काँग्रेस पक्षाच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांत ‘राडा’ झाल्याच्या बातमीने संपूर्ण राज्यात चर्चा सुरु झाली. फोटोसाठी उभे राहण्यावरून प्रदेश सचिव डॉ. अभय पाटील आणि मदन भरगड यांच्यात वादावादी झाली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला होत नाही तोच डॉ. अभय पाटील यांचा दुसराही व्हिडीओ सोशल मिडीयावर आला. यामध्ये बैठकीतून निघाल्यानंतर काही कार्यकर्ते त्यांची समजूत काढण्यासाठी गाडीपर्यंत आले असता डॉ. अभय पाटील यांनी पक्षाविषयी ‘भो*त गेला तो पक्ष फक्ष’ हे उद्गार काढल्याने त्यांना पक्षश्रेष्ठींना या उद्गाराबाबत स्पष्टीकरण द्यावे लागणार आहे.
देशात सत्ताधाऱ्या विरोधात दंड थोपटून उभा असलेला राहुल गांधी यांनी तळात गेलेल्या पक्षाला पुन्हा वर काढण्यासाठी मोठी कसरत सुरु आहेत. तर कॉंग्रेसची डागाळलेली प्रतिमा हळूहळू चांगली करण्याचे प्रयत्न सुरु असताना पक्षाचे पदाधिकारी मात्र पुन्हा मातीत घालण्याचे काम सुरु आहे. येणाऱ्या निवडणुकीत जिल्ह्यातही पक्षाचे चांगले दिवस येत असताना त्याआधीच तिकिटासाठी रस्सीखेच सुरु झालीय. जिल्ह्यात तीस वर्षांपासून काँग्रेस अंतर्गत भांडणामूळे अक्षरश: नेस्तनाबूत झाली. मात्र, यानंतरही अकोल्यात काँग्रेस सुधरायला तयार नाही. काल परवा अकोल्यात झालेल्या एका वादानं अकोल्यातील काँग्रेसमधला कलह पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. काँग्रेसच्या पत्रकार परिषदमध्ये दोन पदाधिकाऱ्यांचा शाब्दिक वाद पाहायला मिळाला.
हा वाद माजी महापौर मदन भरगड आणि अभय पाटिल यांच्यातील होता. माजी मंत्री अजहर हुसेन यांच्या समोरच हा वाद झाला आहे. या वादात एकमेकांना पाहून घेण्याची भाषा झाली. शासकीय विश्रामगृहातील पत्रकार कक्षात हा वाद झाला. हा वाद झाल्यानंतर डॉ. अभय पाटील रागाने सभागृहाबाहेर गेलेत. आपल्या गाडीकडे गेलेल्या डॉ. पाटील आणि नंतर गाडीकडे आलेल्या भरगड यांच्यात परत एकदा वाद झाला. या घटनेचा व्हिडीओ मदन भरगड यांनी ‘महाव्हाईस न्यूज’ सोशल मिडीयाच्या माध्यमातून पाठविला आहे. तर उद्या अकोल्यात कॉंग्रेस पक्षाचे निरीक्षक येणार आहेत तर डॉ. अभय पाटील आणि मदन भरगड यांच्यावर काय कारवाई होणार? हे पाहणे औत्सुक्याच ठरेल…
अकोला | कॉंग्रेसचे प्रदेश सचिव डॉ. अभय पाटील आपल्याच पक्षाविषयी हे काय बोलून गेले?…व्हिडीओ व्हायरल…#akola_Politics @INCMaharashtra pic.twitter.com/64yXH739cz
— Mahavoice News (@MahaVoiceNews) October 20, 2023