आकोट – संजय आठवले
भारत निवडणूक आयोगाद्वारे संपूर्ण देशात मतदार यादी पुनरिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने आकोट विधानसभा मतदारसंघांतर्गत येणाऱ्या आकोट व तेल्हारा तालुक्यातील ३३१ मतदान केंद्रांवर ऑनलाईन व मतदान केंद्र अधिकारी यांचे मार्फत हा कार्यक्रम राबविण्यात येणार असून त्याची अंमलबजावणी २१ जुलैपासून होणार आहे, अशी माहिती आकोट उपविभागीय अधिकारी बळवंतराव अरखराव यांनी दिली आहे.
दिनांक २६ जून रोजी आकोट उपविभागीय अधिकारी यांचे कक्षात राजकीय पक्षांचे पदाधिकारी तथा नागरिक यांची संयुक्त सभा घेण्यात आली. या सभेमध्ये आकोट उपविभागीय अधिकारी बळवंतराव अरखराव यांनी माहिती दिली कि,भारत निवडणूक आयोग दिल्ली व मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य मुंबई यांचे आदेशानुसार दिनांक ०१.०१.२०२४ या अर्हता दिनांकावर आधारीत मतदार यादी पुनरिक्षण कार्यक्रम राबविण्याबाबत निर्देशीत केले आहे.
सदर कार्यक्रमाचे अनुषंगाने २८ आकोट विधानसभा मतदार संघातील आकोट व तेल्हारा तालुक्यातील एकुण ३३१ मतदान केन्द्रांवर ऑनलाईन व संबंधित मतदान केन्द्रस्तरीय अधिकारी यांचे मार्फत खालील प्रमाणे कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.
१.ज्या मतदारांची नावे मतदार यादीत नाहीत तसेच जे मतदार दिनांक ०१.०१.२०२४ रोजी १८ वर्षांचे होणार आहेत त्यांची नव्याने मतदार नोंदणी करण्याकरिता नमुना ६चे अर्ज भरुन मतदार नोंदणी करण्यात येणार आहे.
२. मयत झालेले मतदार, कायम स्वरुपी स्थलांतरीत झालेले मतदार, लग्न झालेल्या मुली यांची नावे मतदार यादीतुन कमी करण्याकरिता नमुना ७ चे अर्ज भरणे.मतदारांची मतदार यादी व मतदान ओळखपत्रातील मजकुरामध्ये दुरुस्ती करण्याकरिता नमुना ८ चा अर्ज भरनणे.
४. ज्या मतदारांनी २८-आकोट विधानसभा मतदार संघातीलच रहिवासाच्या पत्यामध्ये बदल केला असेल त्यांचे नमुना ८ स्थलांतरणाचा अर्ज भरणे.
५.ज्या मतदारांचे मतदार ओळखपत्र गहाळ झाले त्यांचा नमुना ८००१ अर्ज भरुन नविन ओळखपत्रा करिता विनंती अर्ज भरणे.
६.ज्या मतदारांनी अद्यापही आपले मतदान ओळखपत्र आधारकार्डशी जोडलेले नाही त्यांचेकरीता नमुना ६ब भरणे.
७. वरील सर्व अर्ज हे भारत निवडणूक आयोगाचे https://voters.eci.gov.in/ या नविन संकेस्तळावर किंवा संबंधित मतदार केन्द्रस्तरीय अधिकारी यांचेकडे सादर करता येतील.
८. आपले नाव मतदार यादीमध्ये शोधण्याकरिता भारत निवडणूक आयोगाचे https://electoralsearch.eci.gov.in/या व मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य मुंबई यांचे https://ceoelection.maharashtra.gov.in/search/ या संकेतस्थळाचा वापर करावा. मतदार नोंदणी करिता टप्पेनिहाय कार्यक्रम अ.क्र.
१) मतदान केन्द्रस्तरीय अधिकारी यांचेव्दारा घरोघरी भेट देऊन तपासणी / पडताळणी करणे – २१.०७.२०२३ ते २१.०८.२०२३
२)एकत्रीकृत प्रारूप मतदार यादी प्रसिध्द करणे. १७.१०.२०२३
३) दावे हरकती स्विकारण्याचा कालावधी – १७.१०.२०२३ ते ३०.११.२०२३.
४) दावे हरकती निकाली काढणे – २०.१२.२०२३.
५) अंतिम मतदार यादी प्रसिध्द करणे – ०५.०१.२०२४.
या कार्यक्रमाला सर्व नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन आकोट उपविभागीय अधिकारी बळवंतराव अरखराव यांनी केले आहे.