Sunday, July 21, 2024
spot_img
HomeAutoस्वस्त असलेल्या 'या' ७ इलेक्ट्रिक स्कूटर्स...रेंज आणि फीचर्ससह किंमत जाणून घ्या...

स्वस्त असलेल्या ‘या’ ७ इलेक्ट्रिक स्कूटर्स…रेंज आणि फीचर्ससह किंमत जाणून घ्या…

न्युज डेस्क – भारतीय बाजारात आता नवीन कमी किमतील इलेक्ट्रिक स्कूटर्स धुमाकूळ घालत आहे. अनेकांनी आपल्या पेट्रोल गाड्यांचा त्याग करून नवीन इलेक्ट्रिक स्कूटर्स कडे धाव घेतांना दिसत आहे. ज्या लोकांना स्वत:साठी नवीन इलेक्ट्रिक स्कूटर घ्ग्याची आहे आणि त्यांचे बजेट 70 हजार रुपयांपर्यंत आहे, त्यांच्यासाठी Hero Electric, Amo, Okinawa, Battery, Bounce आणि Yulu सारख्या कंपन्यांनी कमी किमतीत चांगल्या इलेक्ट्रिक स्कूटर आणल्या आहेत, ज्या सोबत लुक आणि फीचर्स, रेंजच्या बाबतीतही ते चांगले आहेत. तुमची इच्छा असल्यास, तुम्ही ही इलेक्ट्रिक स्कूटर तुमच्या पालकांना किंवा लहान भावंडांना भेट देऊ शकता. चला तर मग, आम्ही तुम्हाला 70 हजारांच्या स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटरबद्दल सांगतो.

70,000 रुपयांपेक्षा कमी किमतीच्या टॉप 7 इलेक्ट्रिक स्कूटर्स येथे आहेत

बैटरी इलेक्ट्रिक एलओईवी (BattRE Electric LoEV) ची एक्स-शोरूम किंमत रु. 68,900 आहे आणि एकदा बॅटरी पूर्ण चार्ज झाल्यावर तुम्ही 60 किमी पर्यंतची रेंज मिळवू शकता.

Okinawa Lite ची एक्स-शोरूम किंमत 66,993 रुपये आहे आणि त्याची बॅटरी एका चार्जवर 60 किमी पर्यंत आहे.

Okinawa R30 ची एक्स-शोरूम किंमत 61,998 रुपये आहे आणि त्याची बॅटरी रेंज 60 किमी पर्यंत आहे.

एमो इलेक्ट्रिक जॉन्टी (AMO Electric Jaunty) ची एक्स-शोरूम किंमत 62,964 रुपये आहे आणि त्याची सिंगल चार्ज रेंज 75 किमी पर्यंत आहे.

Yulu Wynn ही भारतीय बाजारपेठेत कमी किमतीत एक चांगली इलेक्ट्रिक स्कूटर आहे, ज्याची एक्स-शोरूम किंमत 55,555 रुपये आहे आणि त्याची सिंगल चार्ज रेंज 68km पर्यंत आहे.

हीरो इलेक्ट्रिक ऑप्टिमा (Hero Electric Optima) स्कूटरची सुरुवातीची किंमत 67,190 रुपये आहे आणि एका चार्जवर 82 किमीची रेंज आहे. या इलेक्ट्रिक स्कूटरचा टॉप स्पीड 45 किमी प्रतितास आहे.

बाउंस इनफिनिटी ई1 (Bounce Infinity E1) ची एक्स-शोरूम किंमत 64,299 रुपये आहे आणि त्याची बॅटरी रेंज एका चार्जवर 85 किमी पर्यंत आहे.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: