सांगली – ज्योती मोरे.
राजवाडा चौक येथे वंदेमातरम शिवोत्सव सुरू आहे. शिवप्रतापभूमी मुक्ती आंदोलनाच्या माध्यमातून दिलेल्या २१ वर्ष लढ्याचे छायाचित्र प्रदर्शनास नागरिकांचा प्रतिसाद मिळत आहे. या “वंदेमातरम् शिवोत्सव २०२३” ची सांगता गुरुवार दिनांक २७ एप्रिल २०२३ रोजी राजवाडा चौक, सांगली येथून सायंकाळी ५:०० वाजता भव्य शिव गर्जना रॅलीने होणार आहे. सांगली शहरातील प्रमुख मार्गावरुन ही शिव गर्जना रॅली निघणार आहे. अशी माहिती माजी आमदार नितीन शिंदे यांनी दिली आहे.
या शिव गर्जना रॅलीमध्ये सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे, खासदार संजयकाका पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, माजी आमदार दिनकर पाटील, भाजपा नेते मकरंद देशपांडे, भाजपा प्रदेश सचिव पृथ्वीराज पवार, भाजपा शहर जिल्हाध्यक्ष दिपकबाबा शिंदे, भाजपा नेत्या नीताताई केळकर, उद्योगपती मनोहर सारडा, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेंद्र चंडाळे यांच्या प्रमुख उपस्थित होणार आहे. सर्व शिवभक्तांनी मोठ्या संख्येने या शिव गर्जना रॅलीमध्ये आपापल्या मोटरसायकलसह सहभागी होण्याचे आवाहन माजी आमदार नितीन शिंदे आणि नगरसेविका ॲड. स्वाती शिंदे यांनी केले आहे.