Thursday, September 19, 2024
Homeराजकीयअण्णाभाऊ साठे सोशल फोरम तर्फे मातंग समाज व आंबेडकरवाद या पुस्तकांचे वितरण...

अण्णाभाऊ साठे सोशल फोरम तर्फे मातंग समाज व आंबेडकरवाद या पुस्तकांचे वितरण करून बाबासाहेबांची जयंती केली साजरी…

खामगाव साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे सोशल फोरम तर्फे दिनांक 14 एप्रिल 2023 रोजी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मातंग समाजाला बाबासाहेबांच्या उपकाराची जाणीव व्हावी याकरिता नागपूर येथील सुप्रसिद्ध ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकांतजी वानखडे लिखित मातंग समाज आणि आंबेडकरवाद व इतर ऐतिहासिक पुस्तकासह डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त मातंग समाज व शालेय विद्यार्थी यांना 132 पुस्तकांचे वाटप करण्यात आले तसेच वंचित बहुजन आघाडी जिल्हा अध्यक्ष गणेशभाऊ चौकसे ,अप्पर पोलीस अधीक्षक पाटील साहेब, खामगाव काली पिली स्टॉपचे अध्यक्ष प्रवीणभाई थोरात,माजी सैनिक सामाजिक कार्यकर्ते दादारावजी सरदार यांना सुद्धा पुस्तके भेट देण्यात आले,

याप्रसंगी मातंग समाजाचे ज्येष्ठ नेते संतारामजी तायडे सोशल फोरमचे जिल्हा कार्याध्यक्ष गजानन सोनोने युवा जिल्हाध्यक्ष कृष्णा नाटेकर जिल्हा संघटक शंकर वाघ संदीप जाधव महिला नेत्या रमाबाई नाडे प्रल्हाद निकाळजे तुळशीराम अडायगे सुनील नाटेकर तुळशीराम सोनवणे संदीप मोरे ओम नाटेकर करण मोरे प्रवीण साटोडे गायकवाड भाऊ सुहास तायडे पवन खंडारे स्वप्निल खंडारे आदी सह अण्णाभाऊ साठे सोशल फोरमचे पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: