Saturday, September 21, 2024
HomeSocial Trendingआश्चर्यकारक!…म्हशीला नाचो म्हणताच डान्स करायला लागली…Video Viral

आश्चर्यकारक!…म्हशीला नाचो म्हणताच डान्स करायला लागली…Video Viral

Video Viral : लग्नात घोडा नाचताना आपण बघितला पण एखादी म्हैस नाचू शकते यावर आपला विस्वास बसणार नाही. पण हे खर आहे. या म्हशीचा व्हिडिओ इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओत चक्क म्हैस तबेल्यात डान्स करताना दिसत आहे, ज्याला पाहून ल्काना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की म्हैस आपल्या तबेल्यात बांधलेली असून या दरम्यान एक महिला स्वतः नाचू लागते आणि मग ती म्हशीला नाचायला सांगते. यानंतर म्हैस सुद्धा नाचायला लागते. आणि ती जोरजोरात उड्या मारत ठेका धरते, जे पाहून लोकांच्या चेहऱ्यावर आपोआप हसू उमलते. व्हिडीओमध्ये तुम्ही बघू शकता की म्हशीला घोंगडी पांघरलेली आहे, पण जेव्हा म्हैस वेगाने नाचू लागते तेव्हा घोंगडी उतरते आणि म्हैस जोरदार नाचते.

हा व्हिडिओ videonation.teb ने ट्विटरवर शेअर केला आहे, जो पाहून लोक हसत आहेत. त्याच वेळी, आतापर्यंत 2,400 हून अधिक लोकांनी व्हिडिओ पाहिला आहे. ही म्हैस या मुलीची आज्ञा पाळत कशी नाचतेय याचा व्हिडिओ पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. सोशल मीडियावर या व्हिडिओला खूप पसंती दिली जात आहे, याशिवाय लोक त्यावर मजेशीर कमेंटही करत आहेत.

Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: