Friday, September 20, 2024
Homeराज्यजिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी लोकशाही दिनाचे आयोजन...

जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी लोकशाही दिनाचे आयोजन…

नांदेड – महेंद्र गायकवाड

सामान्य जनतेच्या तक्रारी, अडचणी ऐकून घेऊन त्या सोडविण्यासाठी राज्य शासनाच्यावतीने प्रत्येक महिन्याचा पहिला सोमवारी लोकशाही दिन आयोजित करण्यात येतो. लोकशाही दिन सोमवार 6 फेब्रुवारी 2023 दुपारी 1 ते 3 वाजेपर्यंत कॅबिनेट हॉल, नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे लोकशाही दिन आयोजित केला आहे.

या दिवशी महसूल, जिल्हा पोलिस अधीक्षक , मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, पाटबंधारे विभाग, सार्वजनिक बांधकाम, परिवहन, सहकार, कृषि विभागाचे जिल्हा स्तरावरील प्रमुख अधिकारी व जिल्हा पाणी पुरवठा समन्वय अधिकारी व ज्या कार्यालयाचे लोकशाही दिनात प्रलंबीत प्रकरणे आहेत असे अधिकारी उपस्थित राहतील. दुपारी 12 वाजेपासून निवेदनाची नोंदणी सुरु होणार आहे. त्यानंतर लगेचच प्राप्त झालेल्या अर्जावर, निवेदनावर म्हणणे ऐकून घेण्याच्या कामास सुरुवात करण्यात येईल.

यासाठी अर्ज स्विकारण्याचे व न स्विकारण्याबाबतच्या निकषांचीही नागरिकांनी नोंद घ्यावी. अर्ज विहित नमुन्यात दोन प्रतीमध्ये असावा (नमुना प्रपत्र 1 ते 1 ड) तक्रार किंवा निवेदन वैयक्तिक स्वरुपाची असावी. न्याय प्रविष्ट, राजस्व तसेच अपील, सेवाविषयक, आस्थापना विषयक तसेच विहीत नमुन्यात नसलेले अर्ज, अंतिम उत्तर दिलेले आहे किंवा देण्यात येणार असलेले अर्ज, तक्रार निवेदन वैयक्तीक स्वरुपाचे नसेल तर असे अर्ज स्विकारण्यात येणार नाहीत.

अर्ज स्विकृतीसाठी विहीत नमुन्यात तसेच तक्रार व निवेदन वैयक्तीक स्वरुपाचेच असावे. अर्जदाराने विहीत नमुन्यात 15 दिवस अगोदर दोन प्रतींमध्ये जिल्हाधिकारी कार्यालय येथे अर्ज पाठविणे आवश्यक आहे. तालुकास्तरावर अर्ज दिल्यानंतर एक महिन्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय येथे लोकशाही दिनामध्ये अर्ज करता येणार आहे. लोकशाही दिनाच्या दिवशी प्राप्त होणाऱ्या जनतेच्या तक्रारी, अडचणी एकत्रीतरीत्या समजावून घेऊन त्या शक्य तितक्या लवकर सोडविण्यात येतील, अशी मााहिती जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड यांनी दिली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: