सांगली – ज्योती मोरे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक सांगली येथे चक्रवर्ती महाराजा यशवंतराव होळकर जयंती निमित्त विविध विभागांत यशस्वी निवडीबद्दल सत्कार कार्यक्रम घेणेत आला.सत्कारमुर्ती मान्यवरांनी राजमाता यांचे पुतळ्यास अभिवादन केले. मा. प्रा. डाॅ. भास्कर भंवर यांचे हस्ते महाराजा यशवंतराव होळकर यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले.
त्यानंतर माजी महापौर सौ. संगिता खोत, नगरसेवक विष्णू माने, जनविकास प्रतिष्ठान अध्यक्ष हरिदास लेंगरे, मा. विठ्ठलतात्या खोत, डाॅ. दिलीप मगदुम, डाॅ. स्वप्निल चोपडे, इंजि. शिवाजी शेंडगे, मा. सुरेश पांढरे, प्रा. डाॅ. भार्गव अणुसे, मा. संतोष मदने, मा. कृष्णात हुलवान सर, मा. दत्ता यमगर व मा. हरिबा सरगर यांचे हस्ते एसटीआय परिक्षेतून निवड झालेले नुतन सेल्स टॅक्स कांचन मदने, सुनिल शंकर हुलवान, सुरज महादेव व्हणखंडे,
नुकतीच बीएचएमएस पदवी पात्र अदिका ज्ञानू कोळेकर, शिवाजी विद्यापीठ सिनेटवर निवड झालेले मा. प्रा. डाॅ. प्रशात खरात, मा. प्रा. डाॅ. रघुनाथ ढमकले, विद्यापरिषदेवर निवड झालेले प्रा. डाॅ. पी एम पाटील, हिंदी विषय अभ्यास मंडळ पदी निवड झालेले प्रा. डाॅ. भास्कर भंवर तसेच प्राथमिक शिक्षक बॅंकेचे नुतन संचालक मा. अरविंद गावडे सर, व मा. नामदेव मदने सर, दि सांगली सॅलरी अर्नर्स बॅंकेचे नुतन संचालक मा. आकाराम चौगुले, पीएचडी प्राप्त केलेले प्रा. अरुण घोडके सर, प्रा. डाॅ. सौ. जयश्री खरात, प्रा. डाॅ. काशिलिंग गावडे यांचे सत्कार करण्यात आले.
प्रा. डाॅ. अरुण घोडके, इंजि. शिवाजी शेंडगे, प्रा. डाॅ. रघुनाथ ढमकले, मा. अनिल मिसाळ यांनी महाराजा यशवंतराव होळकर यांचे स्वातंत्र्यसंग्रामी पराक्रमी इतिहास आपल्या भाषणातून सांगितला. कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ. संगिताताई खोत यांनी अशा प्रेरणादायी कार्यक्रमाचे गरज सांगून असे कार्यक्रम वेळोवेळी घेण्याची इच्छा व्यक्त केली.
यावेळी आय टी इस्पेक्टर प्रविण वाघमोडे, अमर पुजारी , उद्योजक जयंत पाटील, अमृत जानकर, अजित येडगे, सौ. रंजना शेळके, संतोष मदने, प्रा. अजित खरात, अनिकेत डोंबाळे, वाघमोडे साहेब, बाळासाहेब खांडेकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक मधुकर हाके यांनी, सुत्रसंचलन व आयोजन निवांत कोळेकर यांनी तर आभार डाॅ. दिलीप मगदुम यांनी मानले.