Wednesday, October 30, 2024
Homeनोकरीतांत्रिक अप्रेन्टिस व कंत्राटी कामगार असोसिएशनचे हिवाळी अधिवेशनावर राज्यव्यापी धरणे आंदोलन...

तांत्रिक अप्रेन्टिस व कंत्राटी कामगार असोसिएशनचे हिवाळी अधिवेशनावर राज्यव्यापी धरणे आंदोलन…

नरखेड–04

महावितरण,महापारेशन,महानिर्मिती कंपनीतील कंत्राटी कामगारांच्या प्रश्नाबाबत शासन व तिन्ही कंपनीचे प्रशासन उदासीन असल्याने त्यांचे लक्ष वेधण्याकरीता हिवाळी अधिवेशनावर नागपूर येथे दि.२२ डिसेंबर २०२२ रोजी एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती तांत्रिक अप्रेन्टिस व कंत्राटी कामगार असोसिएशनचे राज्य कार्याध्यक्ष विक्की कावळे यांनी प्रसिद्धी केलेल्या पत्रकात दिली आहे.

कंत्राटी कामगारांना शाश्वत रोजगाराची हमी द्यावी, महामारीच्या काळात कंत्राटी कामगारांनी केलेल्या कामांची दखल घेत त्यांना कायम सेवेत सामावून घ्यावे, याकरीता विशेष भरती मोहीम राबवावी, कंत्राटी कामगाराकरीता कल्याणकारी मंडळाची स्थापना करण्यात यावी. शिकाऊ उमेदवारांना तिन्ही कंपनीमध्ये चुतुर्थ श्रेणीतील सरळ सेवा भरती मध्ये १०० टक्के आरक्षण त्वरीत लागू करावे, कंत्राटी कामगारांना रोजंदारी पध्दतीवर घेण्यात यावे, शासन नियमाप्रमाणे महावितरण कंपनीमध्ये सरळ सेवा भरतीमध्ये वयोमर्यादावाढवावी.कत्रांटदार मासिक वेतनामधुन ४०००ते ६०००रुपयाची मागणी केली जाते. आदी प्रश्न प्रलंबित आहेत.अनेक वेळा शासन व प्रशासनाला निवेदनाद्वारे कळविण्यात आले आहे.

तरी सुद्धा कामगारांचे प्रश्न मार्गी न लागल्याने तिन्ही कंपनीतील कंत्राटी कामगारांचे प्रचंड प्रमाणात आक्रोश निर्माण झाला असल्याने हिवाळी अधिवेशन नागपूर येथे दि.२२ डिसेंबर २०२२रोजी एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. केंद्रिय अध्यक्ष दिलीप कोरडे, उपाध्यक्ष बी.आर.पवार,गोपाळ गाडगे,सतिश भुजबळ, सरचिटणीस प्रभाकर लहाने, उप सरचिटणीस नितिन भैय्या चव्हाण, शिवाजी शिवणेचारी,संजय उगले,राज्य सचिव आनंद जगताप, संघटक महेश हिवराळे, कोषाध्यक्ष गजानन अघम, तांत्रिक टाईम संपादक सुनिल सोनवणे, उपसंपादक विवेक बोरकर, संस्थापक अध्यक्ष किरण कहाळे, सरचिटणीस प्रकाश वाघ यांचा मागदर्शनाखाली करण्यात येणार आहे.या कंत्राटी कामगारांनी आंदोलनामध्ये सहभागी होण्याचे आवाहन राज्य कार्याध्यक्ष विक्की कावळे, सरचिटणीस राहिल शेख, उप सरचिटणीस प्रताप खंडारे, कोषाध्यक्ष अतुल थेर, उपाध्यक्ष दत्तात्रय धायगुडे, अनिवेश देशमुख,कुणाल जिचकार,मयुर कोठे, दिनेश काळे,विक्की पाचघरे,अमोल ठाकरें, रविन्द्र हौले, श्याम भारती, विकास ठुसे,स्वप्निल सोनसकर,गगन सहारे, स्वप्निल ईटणकर यांनी केली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: