यवतमाळ जिल्हातील राळेगाव तालुक्यातील वीज वितरणच्या कंपनीच्या सहायक अभियंत्याला एका संतप्त शेतकऱ्याने केबल वायरने बेदम मारहाण केली आहे. यवतमाळच्या राळेगाव तालुक्यातील पिंपरी-सावित्री येथील घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे.
शेतकऱ्यांनी वीज जोडणीसाठी महावितरणकडे अर्ज केला होता. वेळेवर वीज जोडणी न केल्याने शेतकऱ्याने तात्पुरता केबल टाकून शेतात वीजजोडणी केली होती. हा प्रकार सहायक अभियंत्याच्या लक्षात आला. यावेळी कारवाईसाठी गेलेल्या सहायक अभियंत्यावर शेतकऱ्यांने हल्ला केला. या प्रकरणी राळेगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर महावितरणच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
यवतमाळ | वीज वितरणच्या कंपनीच्या सहायक अभियंत्याला एका शेतकऱ्याने केबल वायरने बेदम मारहाण… pic.twitter.com/G3Q6vcNNLV
— Mahavoice News (@MahaVoiceNews) November 17, 2023