Saturday, December 21, 2024
Homeगुन्हेगारीकापसाच्या शेतात कामासाठी गेलेली महिला वाघाच्या हल्ल्यात ठार; अहेरी तालुक्यातील चिंतलपेठ येथील...

कापसाच्या शेतात कामासाठी गेलेली महिला वाघाच्या हल्ल्यात ठार; अहेरी तालुक्यातील चिंतलपेठ येथील घटना…

अहेरी – मिलिंद खोंड

कापसाच्या शेतात काम करताना वाघाच्या हल्ल्यात महिला जागीच ठार झाल्याची घटना रविवार (७ जानेवारी) रोजी सकाळच्या सुमारास घडली.सुषमा देवदास मंडल (अंदाजे ५०) रा.चिंतलपेठ ता.अहेरी असे महिलेचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार सदर महिला ह्या मुलचेरा तालुक्यातील मथुरानगर येथील रहिवासी असून मागील १५ ते २० वर्षांपासून चिंतलपेठ येथे स्थायी झाली.घरी किराणा दुकान असून या गावात त्यांची शेती सुद्धा आहे दरम्यान रविवारी सकाळच्या सुमारास शेतात कापूस वेचणी करताना अचानक वाघाने झडप घेऊन हल्ला केला.वाघाच्या हल्ल्यात महिला जागीच ठार झाली असून मंडल परिवारावर दुःखाचे डोंगर कोसळले आहे.

या घटनेची माहिती मिळताच अहेरीचे वनपरिक्षेत्र अधिकारी आरती मडावी आपल्या चमुला घेऊन घटनास्थळी रवाना झाले आहे.मागील काही दिवसांपासुन मुलचेरा तालुक्यातील विविध भागात वाघाचे दर्शन होत आहे.या अगोदर मुलचेरा तालुक्यात वाघाने पाळीव प्राण्यांवर हल्ला केला होता.नुकतेच काही दिवसांपूर्वी कोठारी ते कोपरअली रस्त्यावरील मल्लेरा जवळ काही लोकांना वाघाचे दर्शन झाले होते.अन रविवार सकाळच्या सुमारास चिंतलपेठ येथे वाघाच्या हल्ल्यात महिला ठार झाल्याची घटना समोर आली.

गडचिरोली जिल्ह्यात वाघाचे हल्ले वाढले असून नुकचेतच ३ जानेवारी रोजी गडचिरोली तालुक्यातील वाकडी येथे मंगलाबाई विठ्ठल बोळे या महिलेचा वाघाच्या हल्ल्यात जीव गेला होता.जिल्ह्याच्या उत्तर भागात वाघ आणि रानटी हत्तींचा धुमाकूळ सुरू असताना आता दक्षिण भागातही वाघाचे हल्ले वाढल्याचे दिसून येत आहे.चिंतलपेठ येथील घटनेमुळे परिसरात प्रचंड दहशत निर्माण झाली आहे.वन विभागाने त्वरित वाघाचा बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे.

Milind Khond
Milind Khondhttp://mahavoicenews.com
मिलिंद खोंड, गेल्या 18 वर्षांपासून गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलग्रस्त, आदिवासीबहुल दुर्गम भागात पत्रकारितेचा अनुभव ..पत्रकारितेत पदव्युत्तर पदवी..गोंडवाना विद्यापीठ येथे जन संवाद विभागात गेस्ट प्रोफेसर..तरूण भारत, हिंदुस्थान समाचार,मी-मराठी, न्यूज स्टेट वृत्तवाहिनी चा अनुभव
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: