Thursday, July 18, 2024
spot_img
Homeराज्यगोरेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची महत्वपूर्ण बैठक माजी आमदार राजेंद्रजी जैन यांच्या...

गोरेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची महत्वपूर्ण बैठक माजी आमदार राजेंद्रजी जैन यांच्या उपस्थितित संपन्न…

गोंदिया – राजेशकुमार तायवाडे

गोरेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची महत्वपूर्ण बैठक गोरेगाव स्थित राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालय येथे माजी आमदार राजेंद्र जैन, आमदार मनोहर चंद्रिकापुरे, प्रदेश महासचिव गंगाधर परशुरामकर, जिल्हाध्यक्ष प्रेमकुमार रहांगडाले यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली.

निवडणुका असोत किंवा नसोत पक्षाची संघटन बांधणी हि निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. खासदार प्रफुल पटेल यांनी शेतकऱ्यांच्या धानाला हेक्टरी 20 हजार रुपये बोनस मिळवून देण्याचे काम केले आहे.

यांच्या माध्यमातून झालेल्या विकास कार्याची व शेतकरी, कष्टकरी जनतेच्या हिताकरिता केलेल्या कार्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणून प्रत्येकाने तळागाळातील घटकापर्यंत पोहचून पक्ष बांधणी करावी प्रत्येक बूथ वर युवक, महिला व जेष्ठ नागरिक यांचा समावेश करावा अश्या सूचना मान्यवरांनी मार्गदर्शन करतांना केल्यात.

बैठकीला माजी आमदार राजेंद्र जैन, आमदार मनोहर चंद्रिकापुरे, गंगाधर परशुरामकर, प्रेमकुमार रहांगडाले, राजलक्ष्मी तुरकर, केवल बघेले, विशाल शेंडे, सोमेश रहांगडाले, महेंद्र चौधरी, कृष्णकुमार बिसेन, यु.टी. बिसेन, डॉ संदीप मेश्राम, भूपेश गौतम, सुरेंद्र रहांगडाले, खुशाल वैद्य, अनिता तुरकर, श्रद्धाताई रहांगडाले, ललिता पुंडे, रंजूताई अगडे,

सुषमा अगडे, उषाताई रामटेके, विनोद रहांगडाले, घनेश्वर तिरेले, बाबा बहेकार, नितेश येल्ले, सुनील कापसे, प्रतीक पारधी, कमलेश बारेवार, लोकचंद वाढई, इंद्रराज डोंगरे, हेतराम पटले, चौकलाल येडे, भूमेश्वर कटरे,

रविकांत लांजेवार, शिवाजी ठाकरे, सोनू टेम्भरे, चंद्रकुमार माहूरकर, कुवरलाल भोयर, दिलीप चव्हाण, धर्मेंद्र मानापुरे, दुलीचंद राऊत, राजेंद्र बिसेन, प्रशांत बघेले, ज्ञानेश्वर शहारे, देवेंद्र मानापुरे सहित मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: