Thursday, October 24, 2024
Homeराजकीयसांगलीत कोट्यावधीची व्हेल माशाची उलटी जप्त - दोघांना अटक...

सांगलीत कोट्यावधीची व्हेल माशाची उलटी जप्त – दोघांना अटक…

सांगली – ज्योती मोरे

सांगलीतील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने कारवाई करत पाच कोटी 79 लाख 25 हजार रुपये किमतीचा व्हेल माशाच्या उलटीसह इतर मुद्देमाल जप्त करून दोघा आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती कोल्हापूर परिक्षेत्र पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी दिली. याबाबत अधिक माहिती अशी की खास बातमीदाराने दिलेल्या माहितीनुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगलीच्या पथकाने कारवाई करत शामराव नगरातील डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम कॉलेज जवळून सलीम गुलाब पटेल वय 49 राहणार खनबाग घर नंबर 847 सय्यद अमीर रोड सांगली व अकबर याकूब शेख वय वर्ष 51,

मुक्काम पोस्ट पिंगोली मुस्लिमवाडी तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग या दोघा आरोपींना ताब्यात घेतले आहे. वन विभागातील अधिकाऱ्यांच्या समक्ष त्यांची चौकशी करण्यात येऊन अंग झडती घेतली असता, बर शेख याच्या जवळ एका पुठ्ठ्याच्या बॉक्समध्ये ओबडधोबड पिवळसर तांबूस रंगाचे आयताकृती घट्ट पदार्थ असलेले आठ नग मिळून आले. सदर पदार्थ विषयी चौकशी केल्यानंतर अकबर याने ही व्हेल माशाची उलटी असल्याचे सांगितले.

सदर उलटी ही आचरा जिल्हा सिंधुदुर्ग इथल्या एका साथीदाराने विक्री करण्यासाठी दिली असून ती सलीम पटेल यांच्या मध्यस्थीने विक्री करण्यासाठी घेऊन आल्याचे सांगितले.सदर पदार्थाची वनविभागाच्या वतीने प्राथमिक तपासणी करण्यात आली. सदर पदार्थ हा व्हेल माशाची उलटी असल्याचे सांगण्यात आले आहे. 5 किलो 710 ग्रँम माझी उलटी पोलिसांनी ताब्यात घेतली असून याची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत 5 कोटी 75 लाख 25 हजार रुपये इतकी आहे.

याबरोबरच 25 हजार रुपये किमतीची एक्टिवा गाडी व 3 लाख 50 हजार रुपयांची महिंद्रा बोलेरो पिकप असा एकूण 5 कोटी 79 लाख 25 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, दोघांवरही सांगली शहर पोलीस ठाण्यात वन्यजीव अधिनियम 1972 कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय. सदर कारवाई पोलीस अधीक्षक डॉक्टर बसवराज तेली, अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे,पोलीस उपनिरीक्षक विशाल येळेकर,

अच्युत सूर्यवंशी जितेंद्र जाधव राजू शिरोळकर अमोल ऐदाळे, संदीप पाटील, संकेत मगदूम, राहुल जाधव, मच्छिंद्र बर्डे, सागर टिंगरे, गौतम कांबळे, अजय बेंद्रे, संतोष गळवे, संकेत कानडे तसेच वन विभागातील युवराज पाटील,अजित कुमार पाटील, तुषार कोरे सागर थोरवत आदींनी केली. सदर कारवाईबाबत समाधान व्यक्त करत,पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी पोलीस अधीक्षक डॉक्टर बसवराज तेली यांच्यासह स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे कौतुक केले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: