मुंबई- : बॉलीवूड मधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी गळफास घेवून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. ‘1942 अ लव्ह स्टोरी’, ‘हम दिल दे चुके सनम’, ‘स्वदेस’, ‘खाकी’, ‘लगान’ आणि ‘देवदास’ यांसारख्या चित्रपटांचे कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी आत्महत्या केली आहे.
कर्जत येथील एनडी स्टुडिओमध्ये त्याने गळफास लावून घेतला. त्यांनी चाणक्य आणि तमस सारख्या मालिकांमधून आपल्या करिअरची सुरुवात केली आणि ‘1942 अ लव्ह स्टोरी’ मधील त्यांच्या कामासाठी पहिल्यांदाच त्यांची दखल घेतली गेली. नितीन देसाई यांना कला दिग्दर्शनासाठी चार राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारही मिळाले आहेत.
नितीन देसाई यांनी कर्जत येथे स्वतः उभारलेल्या एन.डी. स्टुडिओमध्ये शेवटचा श्वास घेतला आहे. नितीन देसाई यांनी घेतलेल्या टोकाच्या निर्णयामुळे सिनेविश्वाचं मोठं नुकसान झासं आहे. चित्रपटसृष्टीत प्रवेश करण्याआधी नितिन देसाई यांनी मुंबईतल्या सर जे.जे. कलाविद्यालयातून प्रकाशचित्रणाचे प्रशिक्षण घेतले. १९८७ पासून त्यांनी चित्रपट कारकीर्दीला सुरुवात केली. त्यानंतर नितीन देसाई यांनी कधीही मागे वळून पाहिलं नाही.