रामटेक – निशांत गवई
जोरदार पाऊस सुरू असला तरी विठ्ठल भक्तांनी विठ्ठल मंदिरात गर्दी केल्याचे बघायला मिळाले. दिवसभर महिला भजन मंडळांनी विठुरायाचा गजर केला. रामटेक येथील मैराळ वाड्यातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरातून रथासह पालकी यात्रा काढण्यात आली. तीन मजली रथ सजविण्यात आला. शहरातील प्रमुख रस्त्यांवरून विठूच्या हरिनामाचा जप करीत मुख्य रस्त्याने भ्रमण केल्यानंतर रथयात्रेची मंदिरात सांगता झाली. गांधी चौक, सिनेमा टाकीज, अठराभूजा गणेश मंदिर, रामतलाई व वापस विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये येऊन समारोप झाला.
पालकी यात्रेसाठी संयोजक चंद्रशेखर भोयर, गोपाळराव मैराळ, गोविंदराव मैराळ, दिलीप बिसन, रामसिंग सहारे, मोहन कोठेकर,रामानंद अडामे,शेखर बघेले, उदय भोगे, राजू बिसन, अमय बिसन, सुरेंद्र भोगे, सहित आदींनी प्रयत्न केले. येथील भगतसिंग वॉर्डात असलेल्या मंदिरात पाऊस असूनही विठ्ठल भक्तांमध्ये उत्साह दिसून आला. सकाळपासूनच भाविकांनी दर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती. गेल्या 35 वर्ष्यापासुन पालकी यात्रा निघत आहे.