Sunday, November 17, 2024
Homeव्यापारवाहन खरेदीदारांचे शोरूम्समध्ये जाऊन उत्पादनाची माहिती घेण्याला प्राधान्य...

वाहन खरेदीदारांचे शोरूम्समध्ये जाऊन उत्पादनाची माहिती घेण्याला प्राधान्य…

मुंबई – जे.डी. पॉवर २०२२ इंडिया सेल्स सॅटिस्फॅक्शन इंडेक्स स्टडी (एसएसआय) नुसार, डिजिटलायझेशनच्या युगात भारतातील ७३ टक्क्यांहून अधिक वाहन खरेदीदारांना खरेदी करणाऱ्या मॉडेलबाबत अचूक माहित आहे आणि ८८ टक्के वाहन खरेदीदार ऑनलाइन शोध घेतात, शोरूममध्ये उत्पादनाचा शोध हा ग्राहक अनुभवाचा महत्त्वपूर्ण स्रोत आहे. २०२१ पासून जे.डी. पॉवरने नेल्सनआयक्यूसोबत सहयोगाने इंडिया सेल्स सॅटिस्फॅक्शन इंडेक्स स्टडी पुन्हा लॉन्च केला आहे.

या संशोधनामधून निदर्शनास येते की, एकसंधीपणे उत्पादन शोध घेणाऱ्या ग्राहकांकडे तसे न करणाऱ्या ग्राहकांच्या (अनुक्रमे ८७२ वि. ८४४) तुलनेत २८ इंडेक्स पॉइंट्सची (१,०००-पॉइंट स्केलवर) वाढ झाली आहे. पण भारतातील एक तृतीयांश (३६ टक्के) ग्राहकांनी नमूद केले आहे की, उत्पादन शोध सहभाग एकसंधी नव्हता.

नेल्सनआयक्यू मधील ऑटोमोटिव्ह प्रॅक्टिस इंडियाचे प्रमुख संदीप पांडे म्हणाले “त्वरित माहिती उपलब्ध असण्याच्या युगात देखील विक्री सल्लागाराच्या नेतृत्वाखालील उत्पादन शोधाचे महत्त्व खरेदीचा अनुभव वाढवते. ग्राहक त्यांच्या खरेदीसाठी शोरूममध्ये परत येत असल्याने एकसंधी उत्पादन शोधामधून समाधान मिळण्यास मदत होईल आणि डीलरच्या रेफरल्सना चालना मिळेल.”

२०२२ स्टडीची अतिरिक्त प्रमुख निष्पत्ती पुढीलप्रमाणे:

व्यावसायिक सहभाग समस्यांमुळे एकूणच समाधानावर परिणाम होतो: जवळपास एक तृतीयांश (२७ टक्के) ग्राहक नमूद करतात की, डीलर्ससोबतच्या त्यांच्या व्यावसायिक सहभागादरम्यान त्यांना एक किंवा अधिक समस्यांचा सामना करावा लागला. ज्यांना अशा समस्या येत नाहीत त्यांच्या तुलनेत या ग्राहकांचे सॅटिस्फॅक्शन २६ पॉइंट्सनी कमी झाले आहे.

मिलेनियल्स 1 व जनरेशन झेड ग्राहकांना आनंदित करणे अवघड: मिलेनियल्स व जनरेशन झेड ग्राहक ८५२ च्या एकूण सॅटिस्फॅक्शनसह सर्वात कमी समाधानी आहेत. उद्योगातील सरासरी स्कोअरपेक्षा कमी असलेल्या या स्कोअरमधून उत्पादन शोध सहभागामधील कमी सॅटिस्फॅक्शन दिसून येते. या समूहातील ४१ टक्के ग्राहकांना समस्या जाणवतात, तुलनेत हेच प्रमाण जुन्या ग्राहकांमध्ये ३३ टक्के आहे.

डिलिव्हरीच्या दिवशी आणि त्यापुढील महत्त्वाची स्पष्टीकरणे: ग्राहक डिलिव्हरीच्या दिवशी आणि त्यापुढील महत्त्वाच्या स्पष्टीकरणांबद्दल संवेदनशील आहेत. ज्या ग्राहकांना सर्व स्पष्टीकरणे, विशेष सेरेमनी आणि फॉलो-अप कॉल अशा सुविधा दिल्या जातात त्यांचा सरासरी स्कोअर ८७१ आहे. डीलर यापैकी एक पायरी पूर्ण करण्यात अयशस्वी होतो, तेव्हा सॅटिस्फॅक्शन ८३५ पर्यंत कमी होते.

स्टडी रँकिंग: एमजी ८८१ च्या स्कोअरसह सलग दुसऱ्या वर्षी अव्वलस्थानी आहे. टोयोटा (८७८) दुसऱ्या स्थानावर, तर ह्युंदाई (८७२) तिसऱ्या स्थानावर आहे. २०२२ इंडिया सेल्स सॅटिस्फॅक्शन स्टडी (एसएसआय) जानेवारी ते डिसेंबर २०२१ पर्यंत वाहन खरेदी केलेल्या ६,६१८ नवीन वाहन मालकांच्या प्रतिसादांवर आधारित आहे. हे संशोधन जून ते सप्टेंबर २०२२ या कालावधीत करण्यात आले.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: