Tuesday, July 16, 2024
spot_img
Homeराज्यबार्टी आणि एम सी ई डी पालघर आयोजित उद्योजकता विकास प्रशिक्षण प्रमाणपत्र...

बार्टी आणि एम सी ई डी पालघर आयोजित उद्योजकता विकास प्रशिक्षण प्रमाणपत्र वितरण कार्यक्रम संपन्न…

विरार – बार्टी पुणे पुरस्कृत आणि एम सी ई डी पालघर आयोजित अनुसूचित जातींच्या लाभार्थ्यांसाठी एक महिना अनिवासी उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वीपणे पुर्ण करणाऱ्या प्रशिक्षणार्थीना प्रमाणपत्र वितरण कार्यक्रम मैत्रेय बुद्ध विहार विराट नगर विरार पश्चिम जि पालघर येथे संपन्न झाला.

या कार्यक्रमास जिल्हा प्रकल्प समन्वयक धम्मपाल थोरात, बार्टी पालघर जिल्हा प्रकल्प अधिकारी विलास साबळे , सामाजिक कार्यकर्ते किशोर धस , प्रकल्प समन्वयक आनंद चक्रनारायण , आयोजक दीपक गायकवाड आदींची उपस्थिती होती.

यावेळी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला आणि सर्व मान्यवरांना बार्टी प्रकाशित भारतीय संविधान सरनामा भेट देण्यात आला ….यावेळी प्रशिक्षणार्थीनी आपापली मनोगते व्यक्त केली.सदरील प्रशिक्षण यशस्वीपणे पुर्ण करणारे प्रशिक्षणार्थी हे उद्याचे उद्योजक आहेत आणि आत्मनिर्भर भारत बनण्याचा हा परिपूर्ण संकल्प आहे असा सुर मान्यवरांच्या वक्तव्यातून आला…यावेळी प्रशिक्षणार्थी सह मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: