रामटेक – राजु कापसे
गेल्या महिण्याभर्यापासून चातकासारखी पावसाची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर अखेर हास्य फुलले. शुक्रवारी रात्री आणि शनिवारी सकाळी धो-धो पाऊस बरसल्याने शेतकऱ्यांच्या पेरणीचा मार्ग मोकळा झाला आहे. रामटेक तालूक्यात सर्वच तालुक्यात कमी-अधिक पाऊस झाला. यामुळे दोन दिवसात पेरणीला सुरुवात होण्याचे चिन्ह दिसत आहेत.पावसाळ्यात दडी मारून बसलेल्या पावसाने बेडूक नक्षत्राचा मुहूर्त साधत शनिवारी जोरदार हजेरी लावली.
विजेचा कडकडाट, ढगांचा गडगडाट करीत पावसाचे आगमन झाले. त्यामुळे वातावरणात काही अंशी गारवा निर्माण झाल्याने गेल्या महिण्याभर्यापासून उन्हाची काहिली सोसणाऱ्या नागरिकांना दिलासा जरासा मिळाला आहे. शेतकऱ्यांनासुद्धा आर्द्रा नक्षत्रात बेडूक वाहनावर स्वार होऊन दमदार पाऊस यावा, अशी ओढ लागली आहे. रामटेक तालुक्यात पाऊस रामटेक मंडळ ६६.२ मि.मी पावसांची नोंद तर दोन घराची पडझड नगरधन मंडळ १००.६ मिमी पावसाची नोंद नगरधन ६, चिचाळा ३, मसला २ ,काचुरवाही ४, बोरी १, मुसेवाडी सर्कल- ६५.४ मिमी पावसाची नोंद डोंगरी२, उमरी १०, मांद्री २, भंडारबोडी ४, सञापूर १ , घरांची अंशत घरांची पडझड झाली असुन देवलापार ३५.२ मि.मी. पावसाची नोंद घेण्यात आली.
वातावरणात किंचित गारवा जून महिन्यात मृग नक्षत्रात पाऊस बेपत्ता झाला. नेहमीप्रमाणे मॉन्सूननेसुद्धा दगा दिला. गेल्या महिण्याभरापासून तालूक्यात तापमान स्थिर आहे ऐन पावसाळ्यात मे महिन्यासारखे कडक उन्ह तापत असल्याने सर्वसामान्य जनजीवन प्रभावित झाले आहे. असते. नागरिक उष्णता आणि गर्मीमुळे हैराण आणि कासावीस झाले असून केव्हा पावसाळा सुरू होतो. याचीच वाट पाहत आहेत.
अशातच शुक्रवारी रात्री काही वेळ का होईना पावसाने हजेरी लावल्याने वातावरणात अल्पसा गारवा होता शनिवारला सकाळपासून पावसाला सुरुवात झाली. दुपारपर्यंत पाऊस सुरू असल्याने चिमुकली मुले आनंदाने पावसात भिजताना, आनंद लुटताना दिसून आली. मुसळधार पाऊस, वादळीवारा, मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट लक्षात घेता जिल्ह्यातील शहर व ग्रामीणच्या सर्व शाळा आणि कॉलेजला सुट्टी जाहीर करण्यात आली होती. तालूक्यात पावसामुळे नुकसान झालेल्या गावात उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते व तहसिलदार रमेश कोळपे यांनी घटना स्थळी चौकशी केली.