Saturday, December 21, 2024
Homeराज्यकेंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अर्थसंकल्पातून २०४७ पर्यंतच्या विकसित भारताची पायभरणी :...

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अर्थसंकल्पातून २०४७ पर्यंतच्या विकसित भारताची पायभरणी : माजी आमदार राजेंद्रजी जैन…

गोंदिया – राजेशकुमार तायवाडे

पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वखाली केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी, आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, आज लोकसभेत वर्ष २०२४ – २५ चा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प निवडणूक अर्थसंकल्प असेल अशी अपेक्षा होती. त्या अपेक्षांवर हा अर्थसंकल्प खरा उतरला असून विकसित भारताची पायाभरणी असल्याचे मत माजी आमदार राजेंद्रजी जैन यांनी व्यक्त केले.

माजी आमदार राजेंद्रजी जैन यांनी या अर्थसंकल्पाने २०४७ पर्यंतच्या विकसित भारताची पायाभरणी केली आहे. गरीब, महिला, युवक आणि अन्नदाता शेतकरी यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे. संशोधनाला चालना देण्यासाठी कॉर्पस फंड उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

संशोधन व विकास या क्षेत्रात नवीन उद्योग यावेत यासाठी ५० वर्षे कालावधीचे व्याजमुक्त अर्थसाह्य, त्यासाठी सरकार एक लाख कोटी रुपयांचा निधी तयार करणार तसेच राज्यसरकारांना आर्थिक सुधारणांसाठी ७५ हजार कोटी रुपयांचे ५० वर्षांसाठी व्याजमुक्त कर्ज देण्याची घोषणा, या सगळ्या बाबी राज्यांच्या विकासासाठी उपयोगी ठरणार आहेत असेही माजी आमदार राजेंद्रजी जैन म्हणाले.

पंतप्रधान किसान योजनेतून ११ कोटी ८० लाख शेतकऱ्यांना आर्थिक मदत, ४ कोटी शेतकऱ्यांना पीएम पीकविमा योजनेचा लाभ, आत्मनिर्भर तेलबिया अभियानातंर्गत मोहरी, तीळ, सूर्यफुल, शेंगदाणा, सोयाबीन या तेलबिया देशातच तयार होण्यासाठी विशेष प्रयत्न, दुग्धोत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सर्वंकष योजना, राष्ट्रीय गोकुल मिशनसारख्या योजनांमुळे शेतकऱ्यांना बळ मिळणार आहे, असेही माजी आमदार राजेंद्रजी म्हणाले.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: