राज्यातील राजकीय वातावरण तापले असून आरोप प्रत्यारोपांचा फेरी सुरु झाल्या आहेत. यामध्ये जनतेच चांगलेच मनोरंजन होतांना दिसत आहे. तर कोण कोणत्या पातळीवर टीका करीत आहे? हेही जनतेला समजत आहे. काल शुक्रवारी २३ जून रोजी देशातील १५ हून अधिक विरोधी पक्षांची बिहारमधल्या पाटण्यात बैठक झाली. त्यात उद्धव ठाकरे आणि जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री व पीडीपीच्या नेत्या मेहबुबा मुफ्ती शेजारी बसलेले पहायला मिळाले. त्यावरून भाजपाने सडकून टीका केली. त्यावर आता स्वतः उद्धव ठाकरेंनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
मुंबईतील सर्व शाखाप्रमुख आणि माजी नगरसेवकांच्या बैठकीला संबोधित करताना ठाकरे म्हणाले की, “मेहबूबा मुफ्तींच्या बाजूला बसलोय अशी टीका करत असाल, तर मग असे फोटो माझ्याकडेही आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह तुमचे नेते आहेत की नाही? नवाज शरीफांबरोबर फोटो आहेत. मी माझ्याकडे तुमचा अल्बमच करून ठेवलाय. यांचं सगळं मुस्लीम प्रेम. मी फक्त मेहबूबा मुफ्तींच्या बाजूला बसलो म्हणून तुम्ही माझ्यावर टीका करताय. मी मुद्दाम बसलो.”
पुढे बोलतांना ठाकरे म्हणाले, “तुमचे नेतेही मेहबूबा मुख्तींबरोबर बसले होते. मोठी लोकं गेली त्या मार्गाने जावं असं म्हणतात. आता तुम्ही यांना मोठं मानता की नाही माहीत नाही. पण जर हे चुकीचं असेल, तर तुमचे नेतेही गुन्हेगार आहेत असं बोला. आधी मोदी, अमित शाह गुन्हेगार आहेत हे बोला. मग उद्धव ठाकरे गुन्हेगार आहेत हे बोला,” असं म्हणत उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणीस आणि भाजपाची कोंडी केली.
बैठकीत पुढे बोलतांना म्हणाले, बीएमसीमध्ये कोविडची वेळ तपासा. पंतप्रधानांनी त्यावेळी आपत्ती कायदा आणला होता. तपास करायचाच असेल तर ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवडसह पीएम केअर फंडाचीही चौकशी झाली पाहिजे. ठाकरे म्हणाले की, जे सरकार खोक्यातून जन्माला आले, ते आमची चौकशी कशी करणार? त्यावेळी पीएम केअर फंडातून दिलेले व्हेंटिलेटर सदोष होते. पीएम केअर फंडाचीही चौकशी झाली पाहिजे.
महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेरील लोक म्हणतात की उद्धवजींनी कोविडमध्ये चांगले काम केले, त्यावेळी सर्वत्र त्याचे कौतुक झाले. पण त्याच्या पोटात दुखत आहे. त्यांच्यासाठी जमाल गोटा निवडणुकीच्या माध्यमातून द्यावा लागेल. मी मनसुख मांडविया यांना विचारतो की रेमडेसिविर कोणाला दिले गेले, भाजपशासित राज्यांना किती दिले गेले, ऑक्सिजन कोठून पुरवठा झाला?
मणिपूरमध्ये हिंदू नाहीत का?
मणिपूर जळत आहे, मणिपूरमध्ये हिंदू नाहीत का, तिकडे जा. मुंबई महापालिकेतील काही अधिकाऱ्यांवर छापेमारी सुरू आहे. सर्वांवर करा, पण भेदभाव करू नका, तुमच्या लोकांना क्लीन चिट द्या. नवाब मलिक यांच्यावर कोणत्या कायद्याखाली कारवाई झाली, राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर कारवाई का झाली नाही? पाटील यांनी झाकीर नाईककडून कोट्यवधी रुपये घेतले होते.
मुंबईला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
मुंबईची बदनामी करण्याचा प्रयत्न सुरू आहे, बराक ओबामा मोदींविरोधात बोलले, माझ्याकडे काहीही नसतानाही सगळीकडे उद्धव ठाकरे, उद्धव ठाकरे, नड्डा काल काहीतरी बोलले. मी म्हणतो घराणेशाही आहे, पण तुझा घराणे काय, माझ्या आजोबांचे नाव काम आहे. सुरज हा साधा शिवसैनिक आहे, ठाकरे कुटुंबाला टार्गेट केले जात आहे, देवेंद्र फडणवीस म्हणाले ही बैठक कुटुंबाला वाचवण्यासाठी केली आहे, मी म्हणतो देवेंद्र एवढं कमी पडू नकोस. कुटुंबही तुमचं आहे, व्हॉट्सएपवर खूप काही येत आहे, त्याबद्दल मी काही बोलणार नाही. मला देवेंद्रजींना सांगायचे आहे. तुम्ही तुमच्या घरात राहा. माझ्या घरात घुसण्याचा प्रयत्न करू नका…अन्यथा काही गोष्टी बाहेर काढाव्या लागतील. मग हिंदुत्वाची बदनामी होईल.
फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले
मी, माझे कुटुंब आणि माझा संपूर्ण भाजपा परिवार एक खुली किताब आहे उद्धव ठाकरे ! ज्या ‘व्हॉटसअॅप चॅट’ बाबत तुम्ही बोलताय, ते आरोपपत्राचे भाग आहेत. न्यायालयाच्या रेकॉर्डवर आहेत आणि जाणीवपूर्वक टाकले आहेत, कारण, लपविण्यासारखे आमच्याकडे काहीच नाही. पण, मुख्यमंत्रीपदी राहिलेल्या माणसाला इतकी ‘बालबुद्धी’ असावी, याचे मात्र आश्चर्य वाटते. त्यामुळे त्याची फार चिंता तुम्ही करु नका.
चिंता करायचीच असेल आणि पुस्तक काढायचेच असेल तर यावर काढा
➡️ सामान्य शिवसैनिकांना वार्यावर सोडून मुख्यमंत्रीपद, मंत्रिपद घरात कसे ठेवले यावर…
➡️ मुंबईला कुणी लुटले यावर…
➡️ मृतांच्या टाळूवरील लोणी कुणी खाल्ले यावर…
➡️ मराठी माणसाला कुणी ओरबाडले यावर…
➡️ 100 कोटींच्या वसुलीचे टार्गेट कसे दिले जाते यावर…
तुमचे हिंदूत्त्व आणि तुमचे कारनामे आता एकेक करीत जनतेत उघड होतच आहेत आणि होतच राहणार
आम्ही कुणाच्या घरात घुसत नाही. पण, घुसलोच तर त्यांना तोंड दाखवायला जागा उरणार नाही.
तुमचे ‘नड्डे’ केव्हा सैल होतील, हे समजणार देखील नाही. (नड्डे म्हणजे घसा)
तोवर तुमची हास्यजत्रा चालू द्या…बघूच आता शवासन कुणाला करावे लागते ते…
मी, माझे कुटुंब आणि माझा संपूर्ण भाजपा परिवार एक खुली किताब आहे उद्धव ठाकरे !
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) June 24, 2023
ज्या ‘व्हॉटसअॅप चॅट’ बाबत तुम्ही बोलताय, ते आरोपपत्राचे भाग आहेत. न्यायालयाच्या रेकॉर्डवर आहेत आणि जाणीवपूर्वक टाकले आहेत, कारण, लपविण्यासारखे आमच्याकडे काहीच नाही. पण, मुख्यमंत्रीपदी राहिलेल्या…
'मी मुद्दाम मेहबुबा मुफ्तींच्या बाजूला जाऊन बसलो, तेव्हा कळलं…'@ShivSenaUBT_ @OfficeofUT @MehboobaMufti #OppositionMeeting #LoksabhaElection2024 pic.twitter.com/n5RQ06iJ0k
— BBC News Marathi (@bbcnewsmarathi) June 24, 2023